Black Saree, Dress Ideas For Makar Sankranti 2021: मकर संक्रांती ला पारंपारिक अंदाजात नटण्यासाठी काळ्या रंगातील साड्या, ड्रेससाठी खण, इरकल ते पैठणी पर्याय!
त्यामुळे या सणाच्या निमित्ताने तुम्ही एखाद्या चांगल्या काळ्या रंगाच्या साडी किंवा ड्रेसमध्ये नक्कीच थोडे पैसे खर्च करू शकता.
एरवी शुभ प्रसंगात काळा रंग (Black Colour) हा निषिद्ध मानला जात असल्याने अनेकांना सणा-वाराला काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याच्या आपल्या हौसेला मुरड घालावी लागते. पण मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण हा या सार्याला अपवाद आहे. अनेक जण हमखास भोगी (Bhogi) किंवा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. लग्नानंतरची पहिली संक्रांत किंवा लहान मुलांची बोरन्हाण या मध्ये हमखास काळे कपडे आणि हलव्याचे दागिने तयार करून नटण्याची हौस पुर्ण केली जाते. भारतीय सण हा अनेकींसाठी साड्यांशिवाय अपूर्ण वाटत असतो. मग यंदा मकर संक्रांती निमित्त काळे कपडे, साडी निवडताना खण, पैठणी किंवा इरकल असे अनेक अस्सल पारंपारिक वस्त्रांच्या पर्यायांमध्ये तुम्ही तयार होऊ शकतात. सध्या इंडो वेस्टर्न कपड्यांचा ट्रेन्ड असल्याने तुम्ही खण, पैठणी, इरकल याचं जोड्याने ट्विनिंग करू शकता. Bhogi 2021: सुगड पूजन ते भोगीचा बेत मकर संक्रांतीच्या सणाच्या पहिल्या दिवशी काय काय करतात?
काळी पैठणी
काळ्या रंगाची पैठणी आता सोनेरी आणि चंदेरी अशा दोन्ही बॉर्डर्समध्ये उपलब्ध आहे. सोबतीला पूर्वीप्रमाणे तुम्हांला पैठणीसाठी केवळ सिल्क वर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता हकक्या फुलक्या कॉटन पैठणीचा देखील पर्याय खुला आहे. Makar Sankranti Special Halwyache Dagine: मकर संक्रांत दिवशी हलव्याच्या दागिन्यांमधील मंगळसूत्र, नथ, बांगड्या घरच्या घरी कसे बनवाल?
खण
खण देखील सध्या पुन्हा फॅशन मध्ये आला आहे. खणामध्ये देखील आता स्त्री- पुरूष दोघांचेही कपडे सहज उपलब्ध आहेत. संक्रांतीच्या निमित्तने तुम्ही अस्सल पारंपारिक अंदाजामध्ये तयार होणार असाल तर खणामध्येही काही पर्याय शोधू शकता.
चेकर्स
अगदीच काळा रंग तुम्हांला पसंत नसेल तर चेकर्स पेटर्न म्हणजे चौकसांच्या डिझाईनमध्येही काळ्या रंगाला कॉन्ट्रास्ट रंगामधे तुम्ही तुम्ही काही पर्याय निवडू शकता.
इरकल
इरकल देखील पारंपारिक आणि कायम ट्रेन्ड मध्ये राहणारा एक प्रकार आहे. गर्भ रेशीम इरकल सोबतच खणासोबत काम केलेल्या किंवा कशिदा वर्क मधील काळ्या साड्या तुम्ही संक्रांतीच्या निमित्ताने नक्की ट्राय करू शकता.
काळा, पांढरा हे दोन रंग कधीच फॅशन मधून बाहेर जाऊ शकत नाहीत असे आहेत. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने तुम्ही एखाद्या चांगल्या काळ्या रंगाच्या साडी किंवा ड्रेसमध्ये नक्कीच थोडे पैसे खर्च करू शकता. लहान मुलांचे कपडे देखील अशाच पारंपारिक प्रकारांमध्ये आता सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमचा संक्रांतीच्या निमित्ताने काय प्लॅन आहे? हे नक्की आमच्यासोबत शेअर करा.