Kartiki Ekadashi 2024 Messages: कार्तिकी एकादशीच्या दिवशी Wishes, Greetings, WhatsApp Status, Quotes च्या माध्यमातून शुभेच्छा देत साजरी करा 'देव उठनी एकादशी'

या दिवशी लोक एकमेकांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Wishes, Greetings, WhatsApp Status, Quotes च्या माध्यमातून शुभेच्छा देत 'देव उठनी एकादशी'चा मंगलमय दिवस आणखी खास करू शकता.

Kartiki Ekadashi 2024 Messages 6 (फोटो सौजन्य - File Image)

Kartiki Ekadashi 2024 Messages In Marathi: देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi 2024) हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो. हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. ही एकादशी दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 11 व्या दिवशी साजरी केली जाते. 24 एकादशींपैकी देव उठणी एकादशीला ((Dev Uthani Ekadashi) खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी जागे होतात.

धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भक्त उपवास करतात, भगवान विष्णूची पूजा करतात आणि सुख, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. या एकादशीपासून हिंदू संस्कृतीत लग्नसराईला सुरुवात होते. कार्तिक एकादशी (Kartiki Ekadashi  2024) ला देव उठनी एकादशी तसेच प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi 2024) असेही म्हटले जाते. या दिवशी लोक एकमेकांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Wishes, Greetings, WhatsApp Status, Quotes च्या माध्यमातून शुभेच्छा देत 'देव उठनी एकादशी'चा मंगलमय दिवस आणखी खास करू शकता.

कार्तिकी एकादशीच्या मराठी शुभेच्छा - 

Kartiki Ekadashi 2024 Messages 1 (फोटो सौजन्य - File Image)
Kartiki Ekadashi 2024 Messages 2 (फोटो सौजन्य - File Image)
Kartiki Ekadashi 2024 Messages 3 (फोटो सौजन्य - File Image)
Kartiki Ekadashi 2024 Messages 4 (फोटो सौजन्य - File Image)
Kartiki Ekadashi 2024 Messages 5 (फोटो सौजन्य - File Image)

वैदिक कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 11 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 06:46 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ती 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 04:04 वाजता संपेल. उदय तिथीच्या पार्श्वभूमीवर 12 नोव्हेंबरला देव उठणी एकादशीचे व्रत केले जाणार आहे. यासोबतच दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहाचा उत्सवही साजरा केला जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif