IPL Auction 2025 Live

Kartiki Ekadashi 2023 Messages: कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा विठू भक्तांना देण्यासाठी खास मराठमोळी Greetings, HD Images!

मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुम्ही नक्कीच WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करू शकता.

कार्तिकी एकादशी । File Image

दिवाळी झाली की विठू भक्तांची कार्तिकी एकादशीसाठी (Kartiki Ekadashi) लगबग सुरू होते. यंदा 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठूरायाची आणि रूक्मिणी मातेची खास पूजा केली जाते. एकादशीचं व्रत सांभाळत विठू भक्त विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात. पंढरपूरात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते. असा हा कार्तिकी एकादशीचा दिवस तुमच्या नातेवाईकांना, प्रियजणांना, आप्तेष्टांनाही खास करण्यासाठी डिजिटल मीडीयामध्ये तुम्ही कार्तिकी एकादशी निमित्त WhatsApp Messages, Status, Stickers, Wishes, Photos, HD Images शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.

आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी एकादशी निमित्त देखील पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणीचं मंदिरं आकर्षक सजावटीने झगमगत असतं. देवाची खास वस्त्र आणि अलंकाराने सजवून पूजा करण्याची रीत आहे. वारकरी मंडळी आणि भागवत संप्रदायातील मंडळी एकादशीचा एका दिवसाचा उपवास ठेवून आपली श्रद्धा विठूरायाच्या चरणी अर्पण करतात. मग हा दिवस तुमच्याही आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येवो ही कामना आहे.  Pandharpur Kartiki Ekadashi Yatra 2023: यंदा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या दरम्यान पंढरपूर येथे होणार कार्तिकी यात्रा; भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचना .

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा  

कार्तिकी एकादशी । File Image
कार्तिकी एकादशी । File Image
कार्तिकी एकादशी । File Image
कार्तिकी एकादशी । File Image

 

कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील विठ्ठल-रूक्मिणीची मंदिरं गर्दीने फुलून गेलेली असतात. वारकरी मंडळी पायी वारी करत, दिंड्या, पालख्या घेऊन पंढरपूरात दाखल होतो. या निमित्ताने अखंड हरिनाम सुरू असतो. गाव खेड्यात विठ्ठल नामस्मरणात तल्लीन होत अभंग, भजनं गायली जातात.