Kartiki Ekadashi 2023 Marathi Abhang: कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाचे खास मराठी अभंग व भक्तिगीते ऐकून साजरा करा मंगलमय दिन; पाहा व्हिडीओ (Video)

या दोन महाएकादशी म्हणून ओळखल्या जातात. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते.

Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

Kartiki Ekadashi 2023 Marathi Abhang: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी ही कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2023) किंवा देवउठनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीसह चातुर्मास समाप्त होतो आणि आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले देव जागे होतात असे मानले जाते. याच दिवसापासून सर्व प्रकारच्या शुभ कार्यांचीही सुरुवात होते. यंदा गुरुवार म्हणजेच 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे.

दरवर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठा उत्सव साजरा होतो. यंदाही सोहळ्यासाठी पंढरी सज्ज झाली असून, लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. 23 नोव्हेंबर पहाटे 2 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते विठ्ठल पूजा केली जाणार आहे.

वर्षभरात एकवीस एकादशी असतात त्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व असते. या दोन महाएकादशी म्हणून ओळखल्या जातात. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. अनेक वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पायी वारी करतात. विठ्ठलाच्या नावाचा गजर आणि त्याला टाळ, मृदुंगाची साथ अशा भक्तीमय वातावरणात कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. म्हणूनच या मंगलमय प्रसंगी विठ्ठलाचे काही खास अभंग ऐकून तुम्हीदेखील भक्तिभावाने ही एकादशी साजरी करू शकता.

पाहूया भक्तीगीते व अभंगांचे व्हिडीओ-

(हेही वाचा: Kartiki Ekadashi 2023 Wishes in Marathi: कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत साजरी करा प्रबोधिनी एकादशी)

दरम्यान, 23 नोव्हेंबरला एकादशी झाल्यानंतर 24 नोव्हेंबर पासून तुळशी विवाहारंभ होत आहे. प्रबोधिनी एकादशी 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11.03 वाजता सुरू होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता समाप्त होईल. त्यामुळे गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी एकादशीचे व्रत केले जाईल.

Tags

Dev Uthani Ekadashi Dev Uthani Ekadashi 2023 Dev Uthani Ekadashi Marathi Messages Dev Uthani Ekadashi Messages Dev Uthani Ekadashi WhatsApp Status Dev Uthani Ekadashi Wishes Devendra Fadnavis Kartiki Ekadashi Kartiki Ekadashi 2023 Kartiki Ekadashi 2023 Marathi Abhang Kartiki Ekadashi 2023 Wishes Kartiki Ekadashi Images Kartiki Ekadashi Marathi Messages Kartiki Ekadashi Messages Kartiki Ekadashi Messages 2023 Kartiki Ekadashi Puja Kartiki Ekadashi WhatsApp Status Kartiki Ekadashi Wishes Kartiki Ekadashi Wishes In Marathi Marathi Abhang Pandharpur Prabhodini Ekadashi Prabhodini Ekadashi 2023 Prabodhini Ekadashi Prabodhini Ekadashi 2023 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशी 2023 कार्तिकी एकादशी मराठी शुभेच्छा कार्तिकी एकादशी मराठी संदेश कार्तिकी एकादशी शासकीय महापूजा कार्तिकी एकादशी शुभेच्छा कार्तिकी एकादशी स्टेटस देव उठनी एकादशी देव उठनी एकादशी इमेजेस देव उठनी एकादशी मेसेजेस देव उठनी एकादशी शुभेच्छा पंढरपूर पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिर प्रबोधिनी एकादशी प्रबोधिनी एकादशी 2023 भक्तिगीते भागवत एकादशी मराठी अभंग विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापुजा सण आणि उत्सव