Kartiki Ekadashi 2019 Messages: कार्तिकी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Facebook आणि WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा 'देव उठनी एकादशी' चा सोहळा
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा तुम्हांला मित्र परिवारासोबत, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS, मेसेजेस नक्की शेअर करा आणि तुमचा आनंद द्विगुणित करा.
Prabodhini Ekadashi 2019 Messages and Wishes In Marathi: कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) म्हणजे विठूरायांच्या भक्तांसाठी एक मोठा सोहळा असते. यंदा कार्तिकी म्हणजेच देवउठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) 8 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशीपासून चार महिने निद्रीस्त अवस्थेमध्ये असलेले भगवान विष्णू कार्तिकी एकादशी दिवशी उठवतात आणि पुन्हा नव्या, शुभ कार्यांना सुरूवात होते. कार्तिकी एकादशीचं औचित्य साधून अनेकजण फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारा कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा, देव उठनीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, HD Images शेअर करुन हा दिवस खास बनवतात. मग चातुर्मास संपवून नव्या पर्वाची होते. मग कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा तुम्हांला मित्र परिवारासोबत, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS, मेसेजेस नक्की शेअर करा आणि तुमचा आनंद द्विगुणित करा. Kartiki Ekadashi 2019 Date: कार्तिकी म्हणजेच देव उठनी एकादशी यंदा 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या या एकादशीचं महत्त्व.
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हीच प्रार्थना पांडुरंगाला
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेछा!
यातनांच्या वाळवंटी
असो तुझी छत्रछाया
चुकल्या लेकरासी
दाव थोडीशी दया
उधळावा जीवनात
भक्तीचा सावळा रंग
मनाच्या गाभार्यात वसावा
अनंत तो पांडुरंग
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेछा!
पंढरीची वारी जयाचिये कुळी
त्याची पायधुळी लागो मज
कार्तिकी एकादशी विठू भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
लोपला मनीचा भेदभाव
पाहता रूप पंढरी राव
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
कार्तिकी एकादशी निमित्त
विठ्ठल- रुक्मिणीची कृपा
तुम्हां सार्यांवर कायम राहो!
हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
कार्तिकी एकादशी ही प्रबोधनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. आषाढी ते कार्तिकी एकादशीचा चार महिन्यांचा काळ वारकरी बांधवांसाठी फार महत्त्वाचा असतो. चातुर्मास म्हणून ओळखला जाणार्या या काळात मांसाहारासोबतच कांदा-लसूण यांचे सेवनही व्यर्ज असते.