Kartik Purnima 2019 Shubh Muhurat: कार्तिक पौर्णिमेचा दिवस असतो शुभ, जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहूर्त
कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी महादेवांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. यामुळे या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.
Kartik Purnima 2019 Shubh Muhurat: उद्या म्हणजेच मंगळवार 12 नोव्हेंबरला कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Purnima 2019) आणि देव दिवाळी (Dev Diwali) असेही म्हणतात. या दिवशी महादेवांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. यामुळे या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. हा हा दिवस देव दिवाळी स्वरूपातही साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima 2019) पवित्र नदीमध्ये स्नान, दीपदान, पूजा, आरती, हवन करण्याचे महत्त्व आहे. हा दिसव अत्यंत शुभ समजला जातो. या दिवशी तुम्ही तुमचे शुभकार्य करू शकता. या दिवशी पूजाविधी केल्याने धनलाभ होतो, असं मानलं जातं. (हेही वाचा - Kartik Purnima 2019: कार्तिक पौर्णिमेचे महत्व व धनप्राप्तीचे 'हे' उपाय तुम्हाला माहित आहेत का?)
कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त -
कार्तिक पौर्णिमा तारीख - 12 नोव्हेंबर 2019
पौर्णिमा आरंभ: 11 नोव्हेंबर 2019 ला सायंकाळी 6 वाजून 2 मिनटांनी
पौर्णिमा समाप्ती: 12 नोव्हेंबर 2019 ला सायंकाळी 7 वाजून 04 मिनटांपर्यंत
कार्तिक पौर्णिमा पूजाविधी -
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकर, पार्वती, कार्तिकेय आणि गणपती बाप्पाची पूजा करावी. कार्तिक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केल्याने अधिक लाभ होतो. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केल्याने भगवान शंकर व त्यांच्या परिवाराची कृपा आपल्यावर राहते.
हेही वाचा - Kartik Purnima 2019 : त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? जाणून घ्या याच दिवशी का साजरी केली जाते 'देवदिवाळी'?
या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा करावी, असे केल्यास घरात सुख, शांती आणि समृध्दी नांदते. या दिवशी रात्री घरात, देवळात आणि घराबाहेरही दिवे लावतात. या दिवशी दीपदान, गंगास्नान आणि कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यावे.