Karmveer Bhaurao Patil Jayanti: कर्मवीर भाऊराव पाटील यांंच्या जयंंती निमित्त त्यांंच्या विषयीची फार माहित नसलेल्या या गोष्टी जाणुन घ्या

आज त्यांंच्या जयंंती निमित्त आपण त्यांंच्या एकंंदरीत आयुष्या विषयी व कामाबद्दल फारश्या माहित नसलेल्या गोष्टी जाणुन घेणार आहोत.

Karmveer Bhaurao Patil (Photo Credits: Facebook)

Karmveer Bhaurao Patil Jayanti: कर्मवीर भाऊराव पाटील यांंची आज 123 वी जयंंती आहे.  1887 मध्ये 22 सप्टेंबर रोजी त्यांंचा जन्म झाला होता, त्यांंचे मुळ कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी येथे आहे मात्र त्यांंचे पुर्वज कामानिमित्त महाराष्ट्रात सांंगली व नंंतर कोल्हापुर येथे स्थिर झाले होते, कोल्हापुरातील हातकणंंगले तालुक्यातील कुंभोज या गावात भाऊराव यांंचा जन्म झाला होता. खरं पाहायचं तर भाऊराव हे अत्यंत कर्मठ घराण्यातील होते मात्र त्यांंचा मुळ स्वभाव बंडखोर आणि बेधडक असल्याने त्यांंनी आपले आयुष्य जात न पाळता लहानपणापासुनच असपृश्यांंसोबत आणि त्यांंच्यासाठी खर्ची घातले होते, त्यांंच्यावर राजर्षी शाहु महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांंच्या कामाचा प्रभाव होता. भाऊरावांंनी दलित व अस्पृश्यांंच्या शिक्षणासाठी महत्वपुर्ण काम केले होते, कमवा आणि शिका (Kamva Aani Shika) योजना तसेच रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) ही त्याच कामाची उदाहरणे आहेत.

आज त्यांंच्या जयंंती निमित्त आपण त्यांंच्या एकंंदरीत आयुष्या विषयी व कामाबद्दल फारश्या माहित नसलेल्या गोष्टी जाणुन घेणार आहोत.

कर्मवीर भाऊराव पाटील यांंची माहिती

-कर्मवीर भाऊराव यांचे पू्र्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते.

-भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले.

-महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. आपल्या जीवनातील मोठा काळ ते सुद्धा सत्यशोधक समाजाचे सदस्य होते.

-शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांंनी १९३५ मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय सुरु केले होते.

-अस्पृश्यता मिटवण्यासाठी त्यांंनी बालपणापासुन काम केले होते, याचे उदाहरण म्हणजे, लहानपणी अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नसल्याचे कळताच त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.

- भाऊराव यांंनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी 'कमवा व शिका' हि योजना सुरु केली.

- ऑक्टोबर 4, 1919 रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली.

-रयत शिक्षण संस्था ही आशिया खंंडातील सर्वात मोठी संंस्था असुन महाराष्ट्रात 4 जिल्ह्यात व कर्नाटक मध्ये मिळून याच्या 675 शाखा आहेत.

- भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात एक वसतिगृह स्थापन केले होती ज्यासाठी त्यांंनी पत्नीचे मंगळसूत्र व दागिनेही विकले होते, त्यांंच्या पत्नीचा सुद्धा या कामात मोठा पाठिंंबा होता.

- पुणे विद्यापीठाने भाऊराव यांंना 1959 मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी बहाल केली होती.

- भाऊराव पाटील यांंना भारतीय सर्वोच्च पुरस्कारांंपैकी एक असा पद्मभुषण सुद्धा प्राप्त आहे.

-9 मे 1959 रोजी भाऊराव यांंचे निधन झाले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांंच्या मृत्यु पश्चात सातारा येथे त्यांंचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन उभारण्यात आले आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. बहुजन समाजाला शिक्षणाचा आधार देणार्‍या या महान व्यक्तिमत्वास आज जयंंती निमित्त विनम्र अभिवादन!