Gauri Pujan 2021 Wishes: ज्येष्ठा गौरी पूजनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत माहेरवाशिणींचा खास करा आजचा दिवस!

Gauri Pujan | File Images

गणपती पाठोपाठ घराघरामध्ये गौराईचं आगमन होतं. माहेरवाशिणींसाठी गणेशोत्सवामध्ये 'गौरी पूजन' (Gauri Pujan) हा एक महत्त्वाचा सण असतो. भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना गौराईचे पूजन करतात म्हणून आजचा दिवस ‘ज्येष्ठा गौरी पूजन‘ (Jyeshtha Gauri Pujan) म्हणून ओळखला जातो. मूळात गौरी म्हणजे हिमालयाची कन्या, भगवान शंकराची पत्नी, गणपतीची माता ‘पार्वती ‘ असल्याने महिलांसाठी त्यांच्या माहेरी, मैत्रिणींसोबत नटून थटून साजरा करण्याचा एक दिवस आहे. मग यंदा तुमच्या मैत्रिणींला या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या आज सोशल मीडीयात फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp Status) द्वारा शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स (Greetings) तुम्ही नक्की शेअर करू शकता.

अद्याप कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने घरच्या घरी राहूनच आणि साधेपणाने सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आज तुमच्या मैत्रिणींना, आप्तांना भेटणं शक्य नसेल तर सोशल मीडीयाच्या माध्यमातून हा सण साजरा करा म्हणजे तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल. नक्की वाचा: Gauri Ganpati E-Invitation Cards Marathi Format: गणपती-गौराईच्या ऑनलाईन दर्शनाचं आप्तांना आमंत्रण देण्यासाठी WhatsApp Message, SMS निमंत्रण पत्रिका.

ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gauri Pujan | File Images

गौरी गणपतीच्या आगमना,

सजली अवधी धरती,

सोनपावलाच्या रुपाने

ती येवो आपल्या घरी,

होवो आपली प्रगती,

लाभो आपणास सुख समृद्धी

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gauri Pujan | File Images

गवर गौरी ग गौरी ग,

झिम्मा फुगडी खेळू दे,

हिरव्या रानात रानात

गवर माझी नाचू दे

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gauri Pujan | File Images

गौरी पूजनाच्या प्रथा परंपरा या महाराष्ट्रात प्रत्येक घरागणिक वेगळ्या आहेत. कोकणात आज गौरी पूजनाच्या दिवशी 'ओवसं' च्या रूपात वाण देण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी आज मांसाहाराचा देखील बेत असतो. कोळी समाज देखील मोठ्या थाटात गौरी पूजन करतात. रात्र जागवली जाते. झिम्मा, फुगड्या खेळून आजची रात्र साजरी करण्याची पद्धत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif