Jijabai Death Anniversary 2019: आदर्श पत्नी, आई आणि शासक जिजाबाई यांचं व्यक्तिमत्त्व आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी आदर्श!
त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेक स्त्रियांसाठी आदर्श आहे.
राजमाता जिजाऊ (Jijabai Bhosale) म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आईसाहेब. आज (17 जून) दिवस पुण्यतिथीचा दिवस आहे. जिजाबाई केवळ आदर्श नव्हे तर उत्तम शासक आणि पत्नी होत्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेक स्त्रियांसाठी आदर्श आहे. गोष्टीलखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाबाईंचा जन्म झाला. 1605 साली त्यांचा शहाजीराजांसोबत विवाह झाला. जिजाबाईंच्या आयुष्याबद्दल जाणून अशाच काही शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारात या '8' व्यक्तींकडे होती महत्त्वाची जबाबदारी!
खंबीर जिजाऊ
जिजाऊंच्या खंबीरपणाचे धडे त्यांना त्यांच्या कुटूंबामध्येच मिळाले. विवाहानंतर जिजाऊ यांच्या पती आणि वडीलांमध्ये राजकीय बेबनाव निर्माण झाला. नाती मागे सोडून त्यांनी प्रजेला न्याय मिळवून देण्याच्या कर्तव्यामध्ये कसूर न करता माहेरशी सारे संबंध तोडून पतीशी एकनिष्ठ राहण्याचा मोठा निर्णय घेतला.
चूल आणि मूल पलिकडचा विचार
शहाजी राजे आणि जिजाबाईंनी केवळ चाकरी करून जहागिरी मिळवण्याचा प्रयत्न न करता त्यापलिकडे जाऊन रयतेचा विचार केला. महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुढे त्यासाठी शिवाजी राजांवर त्याप्रकारचे संस्कार केले.
आदर्श आई
शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये जिजाबाईंचा मोठा हात आहे. यामध्ये शिवरायांवर संस्कार करण्यापासून ते त्यांना युद्धनिती, शस्त्रांचे धडे देण्यासाठी मदत करणं, त्यांच्या शिक्षणावर जातीने लक्ष ठेवण्याचं कामही शहाजीराजांच्या अनुपस्थितीमध्ये जिजाबाईंनी मोठ्या धैर्याने केलं.
उत्तम शासक
शहाजीराजांच्या निधनानंतर जिजाबाई सती गेल्या नाहीत. त्या पुरोगामी विचारांच्या होत्या. शहाजीराजांच्या निधनानंतरही त्या खंबीर राहिल्या. शिवराय आणि स्वराज्यांच्या स्थापनेसाठी आपलं जीवन अर्पण करणार्या अनेक मावळ्यांना त्यांनी कित्येक प्रसंगांमध्ये राजनीती, युद्धकलेचे धडे दिले.
जिजाऊ या त्या काळातही बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. शिवरायांचा राज्याभिषेक करण्याच्या वेळेस ब्राम्हणांचा, वैदिकांचा तयंना विरोध होता. मात्र तो झुगारून त्यांनी शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा पार पाडला.
आज 21 व्या शतकामध्ये स्त्रियांना त्यांच्या नैसर्गिक देणगींसोबत शिक्षणाची कवाडं खुली झाली आहेत. याचा फायदा प्रत्येकींसमोर अनेक असंख्य संधी खुल्या आहेत. जिजाऊ व्यक्तिमत्त्व आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे.