Jagannath Rath Yatra 2023: यंदा 20 जूनला पुरी जगन्नाथ रथ यात्रा; तयारीला सुरूवात
भगवान जगन्नाथाची रथयात्रा पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात आणि पुरीच्या मंदिरात लाखो लोक जमतात.
ओडिशा (Odisha) च्या पुरी (Puri) भागातील जगाप्रसिद्ध जगन्नाथ रथ यात्रा (Jagannath Rath Yatra) ची तयारी सध्या जोरात सुरू आहे. Odisha Cooperative Coir Corporation Ltd (OCCC/Coir Board) ने बुधवारी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाला (SJTA) जगन्नाथ रथयात्रेसाठी 26 हेवी-ड्युटी कॉयर दोरखंड सुपूर्द केले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, 26 दोरखंडांपैकी 14 दोरखंड रथ खेचण्यासाठी वापरले जातील तर बाकी 12 दोरखंड रथाला घेराव घालण्यासाठी वापरले जाणार आहे.
दोरखंडांबाबत बोलताना OCCC व्यवस्थापक सुरेंद्र कुमार साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जबाबदारी आमच्यावर सोपवल्याबद्दल मी SJTA चे आभार मानतो. भगवान जगन्नाथाच्या कृपेने आम्ही गेल्या 16 वर्षांपासून अव्याहतपणे रथयात्रेसाठी दोरखंड पुरवत आहोत. Kohinoor हिरा भगवान जगन्नाथाचा, ओडिशाच्या संघटनेचा दावा, कोहिनूर परत भारतात आणण्याची संघटनेने केली मागणी .
साहू यांनी सांगितले की आम्ही 26 दोरखंड पुरवले आहेत, त्यापैकी 12 दोरखंड म्हणून वापरल्या जातील. 12 कॉर्डन दोरांपैकी नऊ दोरी आतील आणि बाहेरील दोरीसाठी वापरल्या जातील आणि तीन पोलिस कॉर्डन म्हणून वापरल्या जातील. या दोऱ्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मनुष्यबळाबाबत साहू म्हणाले की, या दोऱ्या बनवण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून 20 बचत गटांच्या महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी काढली जाते. यावेळी ही यात्रा मंगळवार 20 जून 2023 रोजी काढण्यात येणार आहे. पण, या प्रवासापूर्वी भगवान 15 दिवस एकांतात राहतात.
भगवान जगन्नाथाची रथयात्रा पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात आणि पुरीच्या मंदिरात लाखो लोक जमतात.