International Youth Day 2024 Quotes: आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त Facebook Messages, WhatsApp Status द्वारे तरुणाईला 'हे' प्रेरणादायी कोट्स पाठवून द्या खास शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तुम्ही तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी खालील प्रेरणादायी संदेश सोशल मीडियाद्वारे पाठवू शकता.

International Youth Day 2024 Quotes (फोटो सौजन्य - फाईल ईमेज)

International Youth Day 2024 Quotes: दरवर्षी 12 ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day 2024) साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 17 डिसेंबर 1999 रोजी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. तरुण पिढीला प्रोत्साहान देण्यासाठी जगभरात युवा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतात देखील जागतिक युवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

तरुण वर्ग हा देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शाश्वत विकासासाठी आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांची महत्त्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीतील तरुणांचे योगदान साजरे करण्यासाठी जागतिक युवा दिन हा दिवस एक व्यासपीठ प्रदान करतो. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तुम्ही तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी खालील प्रेरणादायी संदेश सोशल मीडियाद्वारे पाठवू शकता. (हेही वाचा - International Youth Day 2024 Date: आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी आहेInternational Youth Day 2024 Date: आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी आहे? इतिहास, महत्त्व आणि यावर्षी थीम काय? जाणून घ्या ? इतिहास, महत्त्व आणि यावर्षी थीम काय? जाणून घ्या)

दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एक विशिष्ट थीम साजरी करण्यात येते. पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी युवक डिजिटल साधनांचा कसा उपयोग करू शकतात? हे अधोरेखित करणे हा यावर्षीच्या थीमचा उद्देश आहे.