International Yoga Day 2019: यंदाचा जागतिक योगदिन 'Yoga For Heart' थीमवर; रांची मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साजरा करणार योगा डे!
भारतामध्ये रांची (Ranchi) येथे यंदा सरकारकडून योग दिन साजरा केला जाणार आहे.
International Yoga Day 2019 Theme: दरवर्षी जागतिक योग दिन 21 जून दिवशी साजरा केला जातो. यंदा या सेलिब्रेशनचं पाचवं वर्ष आहे. 2015 साली भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये 'योग दिन' (Yoga Day) साजरा करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. तो मंजूर झाल्यानंतर जगभरात 21 जून दिवशी योग दिन साजरा केला जातो. यंदाच्या योगदिन 'हृद्याच्या आरोग्यासाठी योगा'( Yoga For Heart) या थीमवर सेलिब्रेशन होणार आहे. भारतामध्ये रांची (Ranchi) येथे यंदा सरकारकडून योग दिन साजरा केला जाणार आहे. (तुम्ही पादहस्तासन करता का? असा प्रश्न विचारत नरेंद्र मोदी यांनी दिले योगासनांचे धडे)
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 जून दिवशी रांची येथील प्रभात तारा मैदानला होणार्या योग दिनाच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. सुमारे 50,000 नागरिक या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
धकाधकीच्या बनत चाललेल्या यंदाच्या आयुष्यात ऐन तारूण्यात मधुमेह,उच्चदाब, आणि यामधून अनेक हृद्यविकार जडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यावर औषधोपचारासोबतच योगसाधना कशी फायदेशीर ठरेल, कोणती योगासनं केली जाऊ शकतात. याबद्दल माहिती देण्यावर जोर असेल.
योगशास्त्र आणि त्याच्या प्रचार, प्रसारामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना यंदा 'प्रधानमंत्री योगा पुरस्कार' देऊन गौरवण्यात येणार आहे. दोन कॅटेगरीमध्ये चार पुरस्कार दिले जातील. याकरिता 200 हून अधिक अर्जांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.