International Nurses Day 2020 Images: 'जागतिक परिचारिका दिवस' निमित्त मराठी Wishes, Messages, HD Wallpapers सोशल मीडियावर शेअर करुन रुग्णांची सेवा करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना द्या खास शुभेच्छा!

आज जागतिक परिचारिका दिवसाच्या निमित्ताने रूग्ण सेवा करणार्‍या जगभरातील तमाम परिचारिकांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी शेअर करा ही ग्रीटिंग कार्ड्स

International Nurses Day 2020 (PC - File Image)

International Nurses Day 2020 HD Images: आज 12 मे इंटरनॅशनल नर्स डे!  रुग्णांच्या सेवेचा पाया रोवणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन म्हणजेच 12 मे हा दिवस जगभरात ‘नर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल या इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी केली होती. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन रुग्णांची शु्श्रूषा करण्यात अर्पण केले. त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिन (International Nurse Day) म्हणून साजरा करण्यात येतो. Happy International Nurses Day 2020 Greetings: 'नर्स डे' च्या शुभेच्छा मराठी Wishes, Messages, GIFs च्या माध्यमातून शेअर करून निस्वार्थी रूग्णसेवा देणार्‍या प्रत्येक परिचारिकेला करा सलाम!

सध्या संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरात लाखो लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यातील अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांच्या सेवेसाठी नर्स आपलं कर्तव्य बजावत आहेत. 'जागतिक नर्स डे' निमित्त मराठी Wishes, Messages, HD Wallpapers सोशल मीडियावर शेअर करुन रुग्णांची सेवा करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा नक्की द्या. International Nurse Day 2020: मुंबई महापौर किशोरी पेडणेकर ते बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा कोरोना संकटात 'या' महिलांनी पुन्हा स्वीकारला रूग्णसेवेचा वसा!

International Nurses Day 2020 (PC - File Image)
International Nurses Day 2020 (PC - File Image)
International Nurses Day 2020 (PC - File Image)
International Nurses Day 2020 (PC - File Image)
International Nurses Day 2020 (PC - File Image)

प्रत्येक रुग्णालयात डॉक्टरांप्रमाणेचं परिचारिकेचे कार्य मोठं असते. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरक्षित उचलून घेण्याचं काम करणारी परिचारिकाचं असते. आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते. परिचारिका जन्मभर रुग्णांना सेवा देण्याचं काम करतात. यातना आणि वेदनांनी तळमळणाऱ्या रुग्णांची शुश्रूषा करणारी, धीर देणाऱ्या सर्व परिचारिकांना 'आंतरराष्ट्रीय नर्स डे'च्या खूप खूप शुभेच्छा!