International Mother Language Day 2024: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे खास शुभेच्छा संदेश, पाहा

भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, जाणून घ्या अधिक माहिती

International Mother Language Day 2024

International Mother Language Day 2024: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी फेब्रुवारी २१ साजरा केला जातो. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना कॅनडामध्ये राहणारे बांगलादेशी रफीकुल इस्लाम यांनी दिली होती.हिंदी भाषेला  भारताची अधिकृत भाषा असण्यासोबतच, सात देशांमध्ये मातृभाषा म्हणून प्रमुख भाषा म्हणून  स्थान आहे. या सात देशांमध्ये फिजी, न्यूझीलंड, जमैका, सिंगापूर, त्रिनिदाद टोबॅगो, मॉरिशस इ. देशांचा समावेश होतो. 17 नोव्हेंबर 1999 रोजी, UNESCO ने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यास मान्यता दिली होती आणि 21 फेब्रुवारी 2000 रोजी प्रथमच UNESCO च्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात आला.

पाहा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे शुभेच्छा संदेश 

International Mother Language Day 2024
International Mother Language Day 2024
International Mother Language Day 2024
International Mother Language Day 2024
International Mother Language Day 2024

जगभरातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेचा प्रचार आणि संरक्षण करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. हा विशेष दिवस बांग्लादेशात बंगाली ही अधिकृत भाषा बनवण्याच्या संघर्षातून प्रेरित झाला होता. या संदर्भात, 21 फेब्रुवारी 1952 रोजी पूर्व पाकिस्तान  ( बांग्लादेश) मध्ये बंगाली भाषेला मान्यता मिळावी यासाठी जनआंदोलन सुरू करण्यात आले, ज्यामध्ये अनेक लोक शहीद झाले होते.