Happy Labour Day 2020: आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्त मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा लेबर्स डे!
कामगार दिवस हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा महत्वाचा दिवस आहे.
Happy Worker Day 2020: येत्या 1 मे रोजी सर्वत्र 'महाराष्ट्र दिना' (Maharashtra Din) सोबत 'आंतरराष्ट्रीय कामार दिन' (Labour Day) म्हणून साजरा केला जातो. कामगार दिवस हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा महत्वाचा दिवस आहे. 1 मे या दिवशी जगभरातील 80 पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो. देशाच्या विकासामध्ये कामगारांचे योगदान अमुल्य असते त्यामुळे त्यांच्या कामाचा गौरव करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला. मात्र त्यांची पिळवणूक केली जात होती. कोणत्याही सोयीसुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यात 12 ते 14 तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगारांनी एकत्र येण्याचा ठाम निर्णय घेत त्यांनी कामगार संघटनेची निर्मिती केली. प्रत्येक कामगाराला फक्त 8 तास काम असावेस असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली. त्यानंतर 1891 पासून 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो.
ऑस्ट्रेलियापासून सुरू झालेली ही मोहिम पुढे अमेरिका, कॅनडापर्यंत पोहचली. 1891 सालपासून 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो. त्यामुळे यंदाच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्त मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा आजचा लेबर्स डे! (Maharashtra Day 2020: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जाणून घ्या या राज्याच्या गौरवशाली गोष्टी)
कामगार दिनाच्या शुभेच्छा
कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या
जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवाचा दिवस
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो
तो प्रत्येकजण 'मजदूर' असतो
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मानाने भरलेली छाती
कष्टकाऱ्याचे सळसळत रक्त
रोमारोमात भरले कष्टाचे मोल
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
काबाडकष्ट्याला कुणी समजून घ्यावे
मोल योग्य ते घामाचे त्याच्या पदरी घालावे
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाही ऐरा गैरा कोणी, राबणारा कामगार
निर्मितीची शक्ती त्याच्या परी
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
GIF
भारतामधील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात 1 मे 1923 रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदूस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रथम लाल बावटा वापरण्यात आला होता. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीआर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता.