International Joke Day 2021: खळखळून हसवणारे भन्नाट मराठी विनोद!

दरवर्षी 1 जुलै रोजी इंटरनॅशनल जोक डे साजरा केला जातो. वेळ आनंदात घालवता यावा आणि एकमेकांसोबत हास्य विनोद करता यावेत, यासाठी जोक डे साजरा केला जातो.

International Joke Day 2021 (File Image)

हसल्याने आयुष्य वाढतं असं म्हणतात. मात्र हसण्यासाठी कारणीभूत ठरतात ते जोक्स. साधासा, हलका फुलका विनोद देखील त्रासलेलं मन प्रफ्फुलित करतं. दरम्यान, दरवर्षी 1 जुलै रोजी इंटरनॅशनल जोक डे साजरा केला जातो. वेळ आनंदात घालवता यावा आणि एकमेकांसोबत हास्य विनोद करता यावेत, यासाठी जोक डे साजरा केला जातो. जगभरातील विनोदवीरांसाठी हा अगदी खास दिवस आहे. विनोदाला वयाचे बंधन नसते. कोणत्याही वयात आपण जोक्स क्रॅक करु शकतो. त्यामुळे हा दिवस जगातील सर्वच लोकांकडून साजरा केला जातो.

हसणे हे शरीर आणि मनासाठी उत्तम औषधं आहे. हसल्याने शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतात, हे आता विविध अभ्यासातूनही सिद्ध झालं आहे. तसंच हसल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तप्रवाह सुधारतो आणि कॅलरीज बर्न व्हायलाही मदत होते. यामुळेच कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आरोग्यसेवकांकडून डान्स, गाणी किंवा इतर कार्यक्रम करण्यात आल्याचे तुम्ही यापूर्वी ऐकले, पाहिले असेल.

मराठी जोक्स:

1."पत्नीने नव-याला' न सांगता नवीन "सीम" घेतले.

नव-याला "सरप्राईज' द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली.

तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,

"हाय डिअर, कसा आहेस..?"

"नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे...

बायकोने लाटणं तुटेपर्यंत मारला...

2.आता कोरोना काळातील लग्नांमध्ये अशी गाणी वाजतील-

बहारों सॅनिटायझर छिडकाओ मेरा मेहबूब आया हैं|

3. देव जे करतो ते चांगल्यासाठी!

आता हेच बघा ना,

कान बाहेर नसते तर मास्क लावण्यासाठी

खिळे ठोकावे लागले असते.

4. एकदा एक महिलेने कस्मटमर केअरला फोन केला

आणि रागात म्हणाली-

मागील 3 तासांपासून प्रयत्न करतेय तुमच्या कंपनीचे इंटरनेट

चालत नाही, सांगा आता करु?

कस्टमर केअर: मावशी तोपर्यंत थोडं घरचं काम करुन घ्या.

5. नवरा: मला 'कविता' आवडते

बायको: मला पण 'विनोद' आवडतो.

6.

समोरच्याला कधीही कमी समजू नका ….

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

कदाचित ते तुमच्यापेक्षाही येड असेल..

7. गो कोरोना गो,

म्हणून कोरोना गेला नाही तर

हाड कोरोना हाड करुन बघा

दाखवा आपल्या मराठी भाषेचा दणका

हास्य चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतं, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरं आहे. धावपळीच्या, दगदगीच्या जीवनात हास्य विनोद रंग भरतात. त्यामुळे टीव्ही वरील विनोदी मालिका, शोजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now