International Carrot Day 2024: जागतिक गाजर दिनाचा इतिहास आणि महत्व, जाणून घ्या
गाजरांमध्ये फायबरसह कॅरोटीनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जाणून घ्या अधिक माहिती
International Carrot Day 2024: गाजर ही तुमच्या स्वयंपाकघरातील एक पौष्टिक फळ भाजी आहे, जी फक्त भाज्या, सॅलड, सूप, ज्यूस, पराठे, सँडविच, पुडिंग्स, मिठाई यासाठीच नाही तर स्वादिष्ट हलव्यासाठीही वापरली जाते. गाजरांमध्ये फायबरसह कॅरोटीनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवत नाहीत, तर तुमच्या डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे मानले जातात. गाजराची गुणवत्ता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने दरवर्षी 4 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय गाजर दिन साजरा केला जातो. चला जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय गाजर दिनाचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित काही रंजक तथ्य.
आंतरराष्ट्रीय गाजर दिवसाचा इतिहास
दरवर्षी ४ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय गाजर दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 2003 साली सुरू करण्यात आला, ज्याचा मुख्य उद्देश लोकांना गाजरातील महत्त्वाच्या जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांची ओळख करून देणे आणि त्याचे सेवन करण्यासाठी जागरूक करणे हा आहे.
युनायटेड किंगडम, स्वीडन, रशिया, स्वीडन, इटली, जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह भारतातही आंतरराष्ट्रीय गाजर दिवस साजरा केला जातो.
गाजराचे महत्त्वाचे पौष्टिक गुणधर्म!
गाजर हे दृष्टी, निरोगी हृदय, चमकणारी त्वचा आणि तीक्ष्ण मेंदूसाठी महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय गाजर दिनानिमित्त, गाजरांमध्ये असलेले काही महत्त्वाचे मनोरंजक तथ्य जाणून घेऊया.
* गाजरात असलेले व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम आणि बायोटिन यांसारखे पोषक तत्व माणसाला निरोगी ठेवतात.
* गाजरातील जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार बनवतात.
* गाजरात मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
* गाजराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कायम राहते.
* गाजरात असलेले अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे रोग नियंत्रणात राहतात.
* गाजरात असलेले बीटा कॅरोटीन हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे, जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते.
कोणत्या रंगाच्या गाजराचे महत्त्व काय?
लाल गाजर: लाल गाजर भारतात मुबलक प्रमाणात घेतले जातात, गाजराची लागवड भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. हिवाळ्यात खाल्लेल्या लाल गाजरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि हृदय निरोगी राहते.
जांभळे गाजर: जांभळे गाजर त्याच्या इतर प्रजातींपेक्षा अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी मानले जाते. जांभळ्या गाजरांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मँगनीज, व्हिटॅमिन ए आणि सर्व ब जीवनसत्त्वे असतात. त्यामध्ये मर्यादित प्रमाणात कॅलरीज देखील असतात. अँटिऑक्सिडंटने भरपूर जांभळे गाजर कर्करोग, हृदयविकार, मानसिक समस्या आणि वृद्धत्वाच्या समस्यांवर फायदेशीर आहे.
पिवळे गाजर: पिवळ्या रंगाचे गाजर इतर रंगांच्या गाजरांपेक्षा गोड असतात. त्याचा पिवळा रंग त्यात ल्युटीन असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे बीटा-कॅरोटीनचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. बीटा कॅरोटीनचे सेवन केल्याने डोळ्यांचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते. आणि त्वचा तजेलदार बनवते.
डेन्व्हर गाजर : या गाजराचे उत्पादन १८७१ मध्ये मॅसॅच्युसेट्समध्ये सुरू झाले. गडद केशरी रंगाची ही गाजरं सहा ते आठ इंच लांब असतात. डेन्व्हर गाजरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते, जे शरीरात व्हिटॅमिन एचे पुरेसे प्रमाण राखते.
पांढरे गाजर: पांढऱ्या गाजरमध्ये मर्यादित प्रमाणात कॅलरीज असतात आणि त्यात कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात. याच्या सेवनाने फुफ्फुस, स्तन आणि कोलन कॅन्सरचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले हे गाजर त्वचेला हानिकारक सूर्यप्रकाशापासून वाचवते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.