India's 74th Republic Day Google Doodle: भारतीय प्रजासत्ताक दिन 2023 गूगल डूडल तुम्ही पाहिले का? इंडिया गेट, परेड आणि बरंच काही पाहून व्हाल थक्क
India's 74th Republic Day Google Doodle: भारत आज आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी ओळख असलेले गूगलसुद्धा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करत आहे. त्यामुळे गूगलने डूडल (Google Doodle ) द्वारे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.
India's 74th Republic Day Google Doodle: भारत आज आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी ओळख असलेले गूगलसुद्धा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करत आहे. त्यामुळे गूगलने डूडल (Google Doodle ) द्वारे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. आजचे डूडल अहमदाबादस्थित कलाकार पार्थ कोठेकर (Parth Kothekar) यांच्या चित्रणाद्वारे चिन्हांकित केला गेला आहे.
डूडल आर्टवर्कमध्ये इंडिया गेटवर (India Gate) प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Parade), CRPF मार्चिंग तुकडी आणि मोटरसायकल स्वारदाखवले आहेत. डूडल कलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. जी हाताने कापलेल्या कागदापासून तयार केली गेली आहे, त्यात भारताचे राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) देखील समाविष्ट करण्यात आले आहे. (हेही वाचा, Happy Republic Day HD Images 2023: प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेशासाठी HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Message ; साजरा करो राष्ट्रीय उत्सव)
संविधानाचा स्वीकार 26 जानेवारी 1950 मध्ये या दिवशी करून भारताने स्वतःला एक सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य घोषित केले. तेव्हापासून प्रजासत्ताक दिन साजरा होतो. या वर्षीचा प्रजासत्ताक दिन भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण देशाने आपला 74 वर्षांचा प्रवास जिवंत लोकशाही म्हणून साजरा केला आहे. सोबतच भारताने G20 अध्यक्षपदही स्वीकारले आहे.
ट्विट
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही G20 चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल भारताचे कौतुक केले आणि लोकशाही आणि बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देण्याची ही संधी असल्याचे म्हटले. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असलेले इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलाच्या रेजिमेंट्सच्या भव्य परेडचे साक्षीदार होतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)