IPL Auction 2025 Live

Indian Independence Day 2020 Date, Theme, Significance: भारताचा यंदा 74 वा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या या दिवसाचंं महत्त्व आणि थीम

यंदा देशात 74 व्या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन रंगणार आहे.

Independence Day 2020 Wishes (Photo Credits: File Image)

74th Indian Independence Day:  ब्रिटीशांच्या गुलामगिरीमधून भारतीयांची 15 ऑगस्ट 1947 दिवशी मुक्तता झाल्याच्या आनंदामध्ये दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशात 74 व्या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन रंगणार आहे. दरम्यान भारतात अजूनही कोरोना व्हायरसचं संकट असल्याने सार्वजनिक स्वरूपात यावर्षी भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाऊ शकत नाही. परंतू दरवर्षी गावागावात शाळा, कॉलेज, शासकीय, खाजगी कार्यालयं या ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणार्‍या क्रांतिकाराकांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे, नेत्यांचे स्मरण केले जाते. ठिकठिकाणी ध्वजावंदन करून 'जन - मन- गण' गाऊन देशाप्रति आदरभाव व्यक्त केला जातो. Happy Independence Day 2020 Messages: स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Wishes, Greetings, Images, WhatsApp Status पाठवून साजरा करा राष्ट्रीय सण

भारताच्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्ली मध्ये लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. तसेच राजपथावर तिन्ही संरक्षण दलाकडून मानवंदना देत परेडचा कार्यक्रम असतो. यासोबतीला अने सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.

भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा इतिहास

1757 साली भारतामध्ये ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीने प्लाझीच्या लढाईमध्ये विजय मिळवत भारतावर हुकूमत गाजवायला सुरूवात केली. पुढे सुमारे 150 वर्ष भारतावर ब्रिटीशांची सत्ता होती. मात्र हळूहळू भारतीयांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भावना निर्माण करण्यात आली. जेव्हा महात्मा गांधींजींकडे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्त्व आलं तेव्हा त्यांनी असहकार आणि अहिंसा चळवळीच्या माध्यामातून ब्रिटीशांना झुकवलं. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वतंत्र्य भारताचा जन्म झाला.

Indian Independence Act, 1947 ब्रिटीशांनी मंजुर केल्यानंतर भारतामध्ये लोकशाहीला सुरूवात झाली. भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही होती. पंडीत जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. Independence Day 2020 Rangoli Designs: स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' मनमोहक आणि सोप्प्या Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स काढून साजरा करा आजचा दिवस

Independence Day 2020 Theme

Indian Independence Day 2020 हा इतिहासात पहिल्यांदा एखद्या थीमच्या अवतीभोवती साजरा केला जाणार आहे. कोरोना संकटकाळात आता देशाला आत्मनिर्भर बनवणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. सध्या देशात सर्वत्र स्वदेशीचा नारा दिला जात आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा

भारतामध्ये यंदाही 15 ऑगस्टच्या सकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. भारताचं वैशिष्ट्य असलेल्या विविधतेत एकता असणार्‍या मुल्यांच्या सांस्कृतिक, शासकीय कार्यक्रमांमध्ये समावेश असेल. परंतू यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे हा सोहळा सार्वजनिकरित्या साजरा करण्यापेक्षा व्हर्च्युअल स्वरूपात अधिक साजरा केला जाईल.