Happy Independence Day Messages 2023: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा, Wishes, Images, WhatsApp Status शेअर करत द्या राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा
तिरंग्याची ही रचना स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेने स्वीकारली होती.
Happy Independence Day Messages in Marathi: जाती-धर्माच्या सर्व सीमा ओलांडून प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्टचा दिवस, आपला स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) अतिशय खास आहे. याच दिवशी 1947 साली भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका केली होती. भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याची नवी पहाट भारतीयांच्या जीवनात उजाडली होती. आता यंदा देश आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेले स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि भारतीयांच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारताची राष्ट्रीय सुट्टी असते. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यानंतर पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी भारतीय पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशवासियांना संबोधित करतात. राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याची सध्याची रचना पिंगली व्यंकय्या यांनी बनवली होती. तिरंग्याची ही रचना स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेने स्वीकारली होती.
तर आजच्या दिवसाच्या या खास प्रसंगी आपले मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांना WhatsApp Status, Wishes, Messages, Quotes च्या माध्यमातून द्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
दरम्यान, 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. महिलांचा विकास हा स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श असल्याचे सांगून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी देशवासियांना महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले, जेणेकरुन अर्ध्या लोकसंख्येला धैर्याने सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करता येईल आणि जीवनात पुढे जाता येईल.