Independence Day 2020 Songs: स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' काही देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातून द्या वीर-सुपुत्रांना मानवंदना!

Happy Independence Day (Photo Credits-File Image)

Independence Day 2020 Songs: आज 15 ऑगस्ट देशात सर्वत्र 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. हाच जो ऐतिहासिक दिवस ज्या वेळी भारताला इंग्रजांच्या हुकुमशाहीतून सुटका मिळत स्वातंत्र मिळाले होते. परंतु सध्या देशात कोरोना व्हायरसचे महासंकट उभे राहिल्याने त्याचा उत्साह थोडा फिका पडल्याचे दिसून येणार आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही लाल किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. शाळा, महाविद्यालय, ऑफिसांसह ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते. मात्र यावेळी एका वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे.(Independence Day 2020 Special Tricolour Menu: सॅन्डव्हिच ते पुडिंग च्या माध्यमातून तिरंगा मेजवानीचा आस्वाद घेत साजरा करा 74 वा भारतीय स्वातंत्र्यदिन)

स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा उंच आकाशात फडकवून त्याला सलाम केला जातो. प्रत्येक जाती-धर्मातील लोक या दिवशी आझादी मिळाल्याचा आनंद व्यक्त करतात. याच दिवसाचे औचित्य साधत स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' काही देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातून द्या वीर-सुपुत्रांना मानवंदना!(Indian Independence Day 2020 Date, Theme, Significance: भारताचा यंदा 74 वा स्वातंत्र्यदिन; जाणून घ्या या दिवसाचंं महत्त्व आणि थीम)

>>माँ तुझे सलाम!

>>ऐ मेरे वतन के लोगो

>>वंदे मातरम

>>हे राष्ट्र देवतांचे

>>बलसागर भारत होवो

>>जिंकू किंवा मरु

भारत देश ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 150 वर्षे आपल्या देशातील लोकांनी या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत काढली, अनेक हालअपेष्टा सहन केल्या. कित्येकांना फाशीची शिक्षाही झाली. तर कित्येकांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा शूर स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना, रणरागिनींना स्मरण्याचा त्यांना वंदन करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. तिरंग्यातील तीन रंगाचे विशेष महत्व आहे. त्यामधील केशरी रंग हा शक्तीचे प्रतीक, पांढरा रंगा हा शांततेचे प्रतीकस हिरवा रंग हा हरितक्रांतीचे प्रतीक आणि तिरंग्यातील अशोकचक्र हे गति, उद्योग, विकास आणि विस्ताराचे प्रतीक असल्याचे मानले जाते.