Perfume Day Importance: व्हॅलेंटाईन डे सप्ताह जरी संपला असून आता अँटी व्हॅलेंटाईन डे सप्ताह (Anti Valentine Day Week) सुरु झाला आहे. प्रेमाचे गुलाबी दिवस म्हणून व्हॅलेंटाईन सप्ताह म्हणून साजरा केला जातो ज्याच्या उलट प्रेमात धोका मिळालेल्या किंवा नातं तोडण्यासाठी अँटी व्हॅलेंटाईन डे सप्ताह साजरा केला जातो. त्याचा आज तिसरा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे 17 फेब्रुवारी हा परफ्यूम डे (Perfume Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एखाद्या आपल्या प्रिय व्यक्ती सोबत नाते तोडायचे असेल तर त्याला परफ्यूमच्या रुपात सुगंधी द्रव्ये देऊन ते नाते तोडले जाते.
या दिवसाबाबत अनेक जण संभ्रमात आहे. मुळात नातं संपवण्यासाठी एखादं सुगंधी द्रव्ये कसं काय बरं गिफ्ट म्हणून दिलं जाऊ शकतं हा मोठा प्रश्न आहे. मुळात या दिवशी नातं टिकवण्यासाठी आणि नातं तोडण्यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी परफ्यूम भेट म्हणून दिले जाते.
हेदेखील वाचा- Kick Day 2020: अॅन्टी व्हॅलेनटाईन मधील 'किक डे' निमित्त चुकीच्या व्यक्तींना करा दूर
जाणून घेऊया या दिवसाचे महत्व:
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत नाते तोडायचे असेल तर त्याला त्याला आवडीचे परफ्यूम भेट म्हणून द्या. जेणे करुन नातं तुटल्यानंतरही तुमच्या दोघांच्याही आयुष्यात त्या परफ्यूमच्या सुगंधाप्रमाणे आनंदाचे वातावरण कायम राहील. अँटी व्हॅलेंटाईन सप्ताह हा आपल्या प्रेमात धोका मिळालेल्या लोकांना त्याचा बदला घेण्यासाठी असतो. मात्र हा बदला या सप्ताहात असलेल्या दिवसांप्रमाणे ठरलेला असतो.
म्हणूनच आजच्या दिवशी तुम्ही धोका दिलेल्या जोडीदाराला किंवा ज्याच्या सोबत नातं तोडायचं आहे त्याला त्याच्या आवडीचे परफ्यूम देऊन याचा बदला घेऊ शकता. जेणेकरुन तुमचे प्रेमही संपेल आणि तुमच्या दगाबाज जोडीदाराला त्या परफ्यूमच्या सुगंधावरुन त्याने दिलेला धोका कायम लक्षात राहील.