Gudi Padwa 2020: गुढी पाडव्याला 'कडुलिंब' का खातात? जाणून घ्या कडूलिंबाचे औषधी गुणधर्म
या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात. त्यानंतर गुढीला वंदन करून गोड-धोडाचा नैवैद्य दाखवता. यंदा 25 मार्चला गुढी पाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. पुराणांप्रमाणे ब्रम्हदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.
Gudi Padwa 2020: हिंदू धर्मामध्ये गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात. त्यानंतर गुढीला वंदन करून गोड-धोडाचा नैवैद्य दाखवता. यंदा 25 मार्चला गुढी पाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. पुराणांप्रमाणे ब्रम्हदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.
गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. बांबूच्या टोकाला तांबडे जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुलिंबाचे पाने लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवला जातो. तसेच दारासमोर रांगोळी घालून गुढीचं स्वागत केलं जातं. (हेही वाचा - Chaitra Navratri 2020: चैत्र नवरात्री च्या दिवसांत नऊ देवींना कोणता नैवेद्य अर्पण करावा, जाणून घ्या सविस्तर)
गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसचं या दिवशी कडुलिंब घालून प्रसाद तयार केला जातो. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. हा प्रसाद आपल्या आरोग्यासाठी गुणकरी असतो.
हा प्रसाद खाण्यामागे शास्त्रीय कारण आहे. कडुलिंबापासून बनवलेला प्रसाद खाल्ल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात आणि शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. केवळ गुढी पाडव्याच्या दिवशीचं नव्हे तर संपूर्ण वर्षभर कडुलिंबाचे सेवन करावे, यासाठी या दिवशी हा प्रसाद बनवला जातो. कडुलिंबाची पाने सेवन केल्याने कोणत्याही प्रकारचा आजार उद्धभवत नाही. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कडुलिंबाची पाने, फुले, फळे, मुळे आणि खोडाचे सेवन केल्याने पोटातील जंत दूर होण्यास मदत होते.
याशिवाय कडुलिंबाने अंगावर उठणारी खाज आणि इतर त्वचेसंबंधी तक्रारी दूर होतात. कडुलिंबाच्या सेवनाने निरोगी राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील सर्व रोगराई नष्ट होते. त्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे फळ, पान किंवा सालीचे सेवन करण्याची प्रथा आहे