शुभकार्यासाठी का पूजनीय मानला जातो कलश? जाणून घ्या सविस्तर

याबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया विवेक रमेश वैद्य या जाणकार भटजींकडून

Kalash (Photo Credits: Instagram)

घरात कोणतेही शुभकार्य असले की या शुभकार्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे तांब्याचा कलश (Kalash). कोणतीही पूजा, लग्न, साखरपुडा, बारसा अशा सर्व शुभकार्यासाठी कलश हा पूजनीय मानला जातो. हा तांब्याचा कलश पाणी, सुपारी, हळद-कुंकू, आंब्याचे डहाळे, त्यावर नारळ अशा गोष्टींनी हा कलश खरा पूर्णत्वास येतो. तसेच तीर्थ म्हणूनही आपण या कलशातील पाणी वापरतो.

हा कलश म्हणजे नेमके तरी काय किंवा का या कलशाला प्रत्येक शुभकार्यात इतके महत्वाचे मानले असा प्रश्न अनेकांना पडत असतो. याबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया विवेक रमेश वैद्य या जाणकार भटजींकडून:

पाहूया काय आहे धर्मशास्त्रानुसार या कलशाचे महत्व:

कलश म्हणजे पाणी. पाणी म्हणजे पंचमहाभूतांमधील एक शक्ती आहे. आपल्या घरात पाणी तांब्याच्या तांब्यात भरून ठेवतात. कारण तांब्याच्या तांब्यामधूनच सर्व विद्युत प्रवाह चालतो. हा विद्युत प्रवाह, ही चैतन्य ऊर्जा आपल्या घरात सदैव राहावी, यासाठी कोणत्याही मंगलकार्यासाठी कलश आवर्जून वापरले जाते. या कलशात आपण पाणी, सुपारी, हळद-कुंकू, आंब्याचे डहाळे आणि त्यावर नारळ ठेवून ते घरातील मंगलकार्यात वापरले जाते. याला वरुणदेवता असे म्हणतात. या पाण्याच्या देवतेमुळे आपल्या घरांमध्ये पंचमहाभूतांची शक्ती कार्यरत राहावी आणि आपल्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहून जलदेवतेची कृपा कायम राहवी यासाठी पूजेमध्ये कलश महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा- शुभकार्यात का महत्वाचे मानले जाते विड्याचे पान; जाणून घ्या धार्मिक महत्व

आता आपल्याला असा प्रश्न पडेल की, आपण नुसते पाण्याने भरलेले कलशही शुभकार्यात ठेवू शकतो. पण त्यात ठेवण्यात आलेल्या गोष्टींचेही विशेष महत्व आहे. असं म्हणतात की, कलशाच्या मुखामध्ये विष्णू, कंठामध्ये रुद्र आणि पायथ्याला ब्रह्मदेवाचा वास असतो. म्हणून धर्मशास्त्राप्रमाणे कलश हा पूजनीय असून त्या कलश पूजनामुळे घरामध्ये माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होतात.

असे हे चैतन्य, ऊर्जा,लक्ष्मी यांचा वास राहावा यासाठी हे मंगलदायी कलश घरातील शुभकार्यात वापरले जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif