Eid-Milad-un-Nabi 2018: 'या' कारणासाठी मुस्लिम बांधवांसाठी आहे खास!
Eid-Milad-un-Nabi 2018: 12 रबी- उल- अव्वल ही इस्लामिक तारीख सगळ्या मुस्लिम बांधवांसाठी खूप महत्वाची मानली जाते.
Eid-Milad-un-Nabi 2018: 12 रबी- उल-अव्वल ही इस्लामिक तारीख सगळ्या मुस्लिम बांधवांसाठी खूप महत्वाची मानली जाते. या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात शेवटचे पैगंबर हजरच मोहम्मद (SAW) यांचा जन्म झाला होता. त्यामुळेच मुस्लिम बांधव त्यांचा जन्मदिवस म्हणून ईद-ए- मिलाद-उन-नबी हा सण साजरा करतात.
पैगंबर हजरत मोहम्मद हे संदेशवाहक होते आणि त्यांना मुस्लिम धर्मात खूप महत्व दिले जाते. तसेच आदराचे स्थान म्हणून पैगंबर हजरत यांना ओळखले जाते. मुस्लिम धर्माचा प्रचारासाठी पैगंबर हजरत यांनी मेहनत केली. तर जगात सुख आणि शांतीचा मार्ग प्राप्त होण्यासाठी जन्म घेतला होता. मात्र पैगंबर हजरत यांच्या बद्दल असे सांगितले जाते, त्यांना या क्रूरपणाच्या जगात पाठवले गेले होते की त्यामध्ये ही गोष्ट सहजरित्या करणे शक्य होते. त्यामुळे त्यांनी लोकांमध्ये जाऊन सुख आणि शांतीचा संदेश वारंवार देण्याचा प्रयत्न केला.
तसेच मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पैगंबर हजरत यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या होत्या. मात्र यातानांमुळे खचून न जाता त्यांनी समाजात खरेपणा, शांतता आणि समानतेची भावना एकमेकांमध्ये जागृक वृत्ती निर्माण केली.
या ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधव रात्रभर नमाजाच्या माध्यमातून आशिर्वादाची अल्लाहकडे मागणी करतात. तर या दिवशी मोठ मोठे जुलूस निघतात. त्याचबरोबर पैगंबर हजरत यांच्या आयुष्याच्या कथेचे वाचन ही केले जाते. तर काही लोक मदीना येथे जाऊन हा सण साजरा करतात.