Gauri Saree Draping: गौराईला साडी कशी नेसावी? पहा साडी नेसवण्याची सोपी पद्धत (Watch Videos)

तसेच ज्याठिकाणी गौराईची प्रतिष्ठापना केली जाते तिथे सजावट केली जाते. तसेच गौरीचा साज-शृंगार केला जातो. तुम्हीही गौराईची प्रतिष्ठापना करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी गौराईला साडी कशी नेसावी, यासंदर्भात काही टिप्स देणार आहोत.

Gauri Saree Draping (फोटो सौजन्य - You Tube)

Gauri Saree Draping: सध्या सर्वत्र गौराच्या आगमनाची तयारी सुरू आहे. विशेषत: गौरी आवाहनासाठी महिलांची लगबग सुरू असून यंदा आपल्या घरातील गौराई सर्वात सुंदर कशी दिसेल यासाठी सर्वजणी प्रयत्न करत आहेत. यंदा 10 सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी गौराईचे आगमन होणार आहे. पूजेच्या पहिल्या दिवशी, महालक्ष्मी तिच्या दोन रूपांमध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठा रुपात माहेरी येते. यावेळी त्यांचा एक मुलगा आणि एका मुलगीही त्यांच्या सोबत येते. त्यामुळे ज्येष्ठ आणि कनिष्ठा देवीसोबतचं या दोन लहान बाळाचे पुतळे बसवण्याचीही पद्धत आहे.

पहिल्या दिवशी गौराईचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते. पहिल्या दिवशी गौराईला साडी नेसवली जाते. तसेच ज्याठिकाणी गौराईची प्रतिष्ठापना केली जाते तिथे सजावट केली जाते. तसेच गौरीचा साज-शृंगार केला जातो. तुम्हीही गौराईची प्रतिष्ठापना करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी गौराईला साडी कशी नेसावी, यासंदर्भात काही टिप्स देणार आहोत. तुम्ही खालील व्हिडिओज पाहून गौराईला साडी नेसवू शकता. (हेही वाचा - Gauri Avahan Messages in Marathi: गौरी आवाहनानिमित्त Wishes, Greetings,WhatsApp Status शेअर करून करा गौराईचं स्वागत)

गौराईला साडी कशी नेसावी, पहा व्हिडिओज - 

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला गौरी आवाहन करण्याची पद्धत आहे. मराठी स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया गौरी मूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि गौराईला सुंदर कपडे आणि दागिन्यांनी सजवतात. गौरी आवाहनाच्या दिवशी स्त्रिया मोठ्या थाटामाटात गौरी मूर्तीची प्रतिष्ठापना करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif