यंदाचा दसरा (Dussehra) २५ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. शारदीय नवरात्रीची सांगता दसरा या सणाने होते. देशभरात विविध स्वरूपात दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन ( Saraswati Pujan ) केले जाते.सरस्वती पूजन हा एक हिंदू धार्मिक आचार आहे.वसंत पंचमी आणि विजयादशमी या दोन दिवशी सरस्वती पूजन केले जाते.उत्तर भारतात सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी करतात, तर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी ही पूजा केली जाते.
दस-याच्या दिवशी लहान मुले शाळेत अथवा घरात अभ्यासाच्या पाटीवर सरस्वतीचे प्रतीकरूप चित्र काढतात. झेंडूची फुले वाहून, उदबत्ती ओवाळून त्याची पूजा करतात. अभ्यासाची पुस्तके, ग्रंथ यांचेही पूजन या दिवशी केले जाते.वसंत पंचमीच्या दिवशी लहान मुलांचा शाळेत प्रवेश होतो आणि अक्षर ओळख करून देत त्यांची अभ्यासाची सुरुवात या दिवशी होते. (Good Luck things for Dussehra : दसऱ्याला 'या' गोष्टी मानल्या जातात शुभ)
या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन व शमीपूजन आणि शस्त्रपूजा करतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती.सरस्वती पूजनाच्या दिवशी पाठीवर हाताने सरस्वती काढणे हे सर्वांच्याच आवडीची गोष्ट मानली जाते.पण काहींना इच्छा असूनही सरस्वती काढणे जमत नाही.आज पाहुया सोप्या पद्धतीने सरस्वती कशी काढू शकाल.
१ या अंकाचा वापर करुन ही सोपी पद्धत तुम्ही वापरु शकता
हाताने नीट रेषा जमत नसतील तर पट्टीचा वापर करुन अशा पद्धतीने सरस्वती काढा.
तुम्हाला रांगोळीने सरस्वती काढायची असेल तर ही पद्धत तुम्ही वापरु शकता
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला या सोप्या सरस्वती अगदी लहान मुलांना जमतील अशा आहेत.तेव्हा दसऱ्याच्या दिवसपर्यंत नक्की या सरस्वतीची प्रैक्टिस करा. आणि सुंदर अशी सरस्वती रेखाटा.