IPL Auction 2025 Live

Makar Sankranti 2023 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे? महत्त्व आणि पूजाविधी जाणून घ्या

महाराष्ट्रात सवाष्ण महिला सुघड पुजून करून एकमेकींना वाण देतात. संक्रांतीनिमित्त सुगडाची पाटावर पूजा केली जाते.

Makar Sankranti Sugad Puja Vidhi (Photo Credits: Instagram)

Makar Sankranti 2023 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती हा नव वर्षातील पहिला सण आहे. हा सण तिळगूळ वाटून, पतंग उडवून आनंदात साजरा केला जातो. या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुवासिनी सुगड पूजन करतात आणि एकमेकींना वाण देतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्याची प्रथा आहे. 'सुघट' म्हणजे शेती मालांनी भरलेला घट. त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात 'सुगड' (Sugad) असा झाला.

शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी पूजले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगडाची पूजा करतात. महाराष्ट्रात सवाष्ण महिला सुघड पुजून करून एकमेकींना वाण देतात. संक्रांतीनिमित्त सुगडाची पाटावर पूजा केली जाते. (हेही वाचा - 'मकर संक्रांत' नक्की का साजरी करतात; जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व)

मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे?

मकर संक्रांतीचा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार, जानेवारी महिन्याशी सुसंगत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे.