Holi 2023 Date: होळी आणि धुलीवंदन कधी आहे? जाणून घ्या, तारीख आणि दहनाचा शुभ मुहूर्त
तरुणाईत होळी सणाचा उत्साह अधिक असतो. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या सणाच्या निमित्ताने रंगांची उधळण केली जाते, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Holi 2023 Date:होळी आणि धुलीवंदनाचा सण जवळ आला आहे. तरुणाईत होळी सणाचा उत्साह अधिक असतो. होळी आणि धुलिवंदनच्या सणानिमित्ताने रंगांची उधळण केली जाते. आणि रंगांचा सण उत्साहात साजरा केला जातो. होलिका दहनाने या सणाची सुरूवात होते तर रंगपंचमीला पर्यंत रंगांची उधळण केली जाते. होळी सण हुताशनी पौर्णिमेला असतो आणि होलिका दहन करून केली जाते होळी साजरी केली जाते. होलिका दहनचा सण 6 मार्च 2023 होळी पेटवून साजरी केली जाईल. होलिका दहनानंतर धुलिवंदन असते. धुलिवंदनाला एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरा केला जातो. 7 मार्चला रंगांची उधळण केली जाणार आहे. हिंदू धर्मात होळी हा सण उत्सासाहात साजरा केला जातो. त्यामुळे होळीनिमित्त भारताच्या विविध प्रांतांमध्ये निरनिराळे गोडाचे पदार्थ तयार केले जातात. दरम्यान आम्ही सणाची तारीख आणि मुहूर्त घेऊन आलो आहोत, पाहा [ हे देखील वाचा: Konkan Holi Special Train 2023: कोकणवासीयांसाठी खुषखबर; होळीसाठी कोकण रेल्वेची स्पेशल ट्रेन ]
होळी दहनाची तारीख आणि मुहूर्त, जाणून घ्या
होळी दहन : 6 मार्च
शुभ मुहूर्त: संध्याकाळी 6.24 ते 8.51 pm
होळीच्या रूपात मनात वाईट अविचार सारे अनिष्ट जळून खाक व्हावे अशी कामना केली जाते.
धुलीवंदन
यंदा 7 मार्चला धुलीवंदनचा सण साजरा केला जाईल. धुलीवंदनसाठी बाजारात रंग मिळत असलेल्या रंगानी धुलीवंदन साजरे करतात.
महाराष्ट्रात होळीचा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. राज्यात होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या विविध प्रांतांमध्ये निरनिराळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. होळीच्या निमित्ताने पुरणपोळी, गुज्जिया, थंडाई बनवली जाते, पदार्थ प्रमाणे साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे.