Hartalika Vrat 2026 Wishes In Marathi: हरतालिका व्रताच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Images द्वारा शेअर करत साजरा करा सअण सौभाग्याचा

तुमच्या सख्यांना यंदा गणपती आगमनादिवशी गणेश चतुर्थी सोबतच हरतालिका व्रताच्या देखील शुभेच्छा WhatsApp Messages, Facebook, Instagram Status, Wishes, Quotes च्या माध्यमातून देत सणाचा आनंद द्विगुणित करा.

Hartalika Wishes

गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) आदला दिवस हा हरतालिका व्रताचा (Hartalika Vrat) असतो. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला येणारा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. हरतालिका व्रत हे विशेषतः वैवाहिक सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. मात्र यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आली आहे. मग तुमच्या सख्यांना यंदा गणपती आगमनादिवशी गणेश चतुर्थी सोबतच हरतालिका व्रताच्या देखील शुभेच्छा WhatsApp Messages, Facebook, Instagram Status, Wishes, Quotes च्या माध्यमातून देत सणाचा आनंद द्विगुणित करा.

पौराणिक कथेनुसार, पार्वती मातेने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती, त्याच स्मरणार्थ हे व्रत आचरले जाते. महिला या दिवशी रात्रभर जागरण करून भजन-कीर्तन करतात आणि दुसऱ्या दिवशी पूजा सांगता करून उपवास सोडतात. नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2026: हरतालिका, गणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी मग बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी? जाणून घ्या मुहूर्ताची वेळ 

हरतालिका व्रताच्या शुभेच्छा

 

Hartalika Wishes
Hartalika Wishes
Hartalika Wishes
Hartalika Wishes
Hartalika Wishes

 

यंदा सोमवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपून भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुरू होते. सूर्योदयाच्या वेळी भाद्रपद शुक्ल तृतीया असल्याने त्याच दिवशी हरतालिका पूजन करायचे आहे.हरतालिकेचा उपवास मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी सोडायचा आहे. कोणी ऋषिपंचमीचा उपवासही करत असेल, तर अन्नाचा वास घेऊन हरतालिकेचा उपवास सोडता येतो आणि ऋषिपंचमीचा उपवास पुढे सुरू ठेवता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement