Hartalika Teej 2024 Mehndi Design: हरतालिका तीजनिमित्त हातावर काढा 'या' खास मेहंदी डिझाईन्स (Watch Video)
जर तुम्हीही हरतालिका तीजवर कमी वेळात आणि सहज हातावर लावता येतील अशा मेहंदी डिझाइन्स शोधत असाल, तर आम्ही या लेखात दाखवलेल्या मेहंदीच्या डिझाईन्स पाहून तुम्ही तुमच्या हातावर सुंदर मेहंदी डिझाईन्स काढ शकता.
Hartalika Teej 2024 Mehndi Design: सर्वत्र सणांची धामधूम सुरू आहे. एकामागून एक सण येऊ घातले आहेत. काजरी तीजचा सण काही दिवसांपूर्वीच सुरू झाला असून आता हरतालिका तीज (Hartalika Teej 2024) चा सण साजरा करण्यात येणार आहे. हरतालिका तीज हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून या सणाच्या दिवशी महिला साज-शृंगारही करतात. परंतु, मेहंदीशिवाय कोणत्याही महिलेचा मेकअप पूर्ण होत नाही.
जर तुम्हीही हरतालिका तीजवर कमी वेळात आणि सहज हातावर लावता येतील अशा मेहंदी डिझाइन्स शोधत असाल, तर आम्ही या लेखात दाखवलेल्या मेहंदीच्या डिझाईन्स पाहून तुम्ही तुमच्या हातावर सुंदर मेहंदी डिझाईन्स काढ शकता. (हेही वाचा -September 2024 Festival Calendar: हरतालिका तीज, गणेश उत्सव, पितृ पक्ष कधी कधी आहे? पहा सप्टेंबर महिन्यातील सणांची संपूर्ण यादी)
हरतालिका तीज निमित्त हातावर काढा या सुंदर मेहंदी डिझाईन, पहा व्हिडिओ -
हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 वाजता सुरू होईल, जी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 वाजता समाप्त होईल. उदय तिथीवर आधारित, हरतालिका तीज शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 ला साजरी करण्यात येणार आहे.