Haridwar Kumbh Mela 2021: यंदा हरिद्वार मधील कुंभमेळा एप्रिल महिन्यात अवघ्या 30 दिवसांचा

दर 12 वर्षांनी देशात 4 ठिकाणी या कुंभमेळ्याचं आयोजन केले जातं. हा कुंभमेळा नाशिक, हरिद्वार, अलाहाबाद आणि उज्जेन मध्ये आयोजित केला जातो. दरम्यान यावर्षीचा कुंभमेळा हरिद्वार मध्ये आहे.

Kumbh Mela (Photo Credits-Twitter)

कुंभमेळा 2021 (Kumbh Mela) चं आयोजन यंदा 1 ते 30 एप्रिल दरम्यान केले जाणार आहे. यावर्षी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये कपात करून तो केवळ 30 दिवसांचा करण्यात आला आहे. या कुंभमेळ्याची अधिकृत माहिती/ नोटिफिकेशन मार्च महिन्याच्या शेवटी दिली जाईल असं उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश (Om Prakash) यांनी सांगितलं आहे.

कुंभमेळा यापूर्वी 4 महिन्यांवरून 2 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आला होता मात्र आता वाढता कोरोनाचा धोका पाहता कुंभमेळा 48 दिवसांचा असेल. यावर्षीच्या कुंभमेळ्यात एप्रिल महिन्यात 3 शाही स्नानाच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. त्यासोबत 11 मार्च दिवशी महाशिवरात्र असल्याने या दिवशी देखील शाही स्नान होईल. दरम्यान उत्तराखंडामध्ये कोरोना रूग्ण कमी असले तरीही सरकार कोणताही धोका स्वीकरण्याच्या तयारीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यंदा कुंभमेळ्यासाठी कोणत्याही विशेष बस, ट्रेनची घोषणा केली जाणार नाही. कोणालाही बस घेऊन जायचं असेल तर त्यासाठी आधी उत्तराखंड सरकारची परवानगी अनिवार्य असेल. यंदा कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी कोविड 19 लसीचे देखील अधिकचे डोस पुरवले जाणार आहेत.

भारतामध्ये कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. दर 12 वर्षांनी देशात 4 ठिकाणी या कुंभमेळ्याचं आयोजन केले जातं. हा कुंभमेळा नाशिक, हरिद्वार, अलाहाबाद आणि उज्जेन मध्ये आयोजित केला जातो. दरम्यान यावर्षीचा कुंभमेळा हरिद्वार मध्ये आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif