Happy World Pharmacist Day 2020 Wishes: जागतिक फार्मासिस्ट डे च्या शुभेच्छा WhatsApp, Facebook च्या माध्यमातून शेअर करून कृतज्ञता व्यक्त करा औषध पुरवठा करणार्या Druggists ना!
जागतिक फार्मासिस्ट डे 2020 च्या निमित्ताने आज तुम्हांला मदत केलेल्या फार्मासिस्टने या World Pharmacist Day 2020 च्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबूक च्या माधय्मातून मेसेजेस, विशेस, शुभेच्छापत्र देऊन त्यांचा आजचा दिवस खास बनवा.
जगभरामध्ये World Pharmacist Day हा दिवस 25 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. दरम्यान या दिवसाची सुरूवात International Pharmaceutical Federation कडून झाली आहे. जागतिक फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने अहोरात्र आरोग्य यंत्रणेमध्ये रूग्णांना औषधांचा पुरवठा करणार्या फार्मासिस्ट व्यक्तींच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान मागील 6 महिन्यापासून जगभरात कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असताना अनेक फार्मासिस्ट दुकानदारांनी त्यांची दुकानं अहोरात्र त्यांची दुकानं खुली ठेवली आहेत. कुणी संसर्गाची भीती पाहता अनेकांना घरपोच औषधं पुरवली आहेत. तर अनेक फार्मासिस्ट कंपन्या आता लस उपलब्ध होई पर्यंत पर्यायी औषधं जास्तीत जास्त आणि स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत. मग अशा सार्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी आजचा दिवस आहे. जागतिक फार्मासिस्ट डे 2020 च्या निमित्ताने आज तुम्हांला मदत केलेल्या फार्मासिस्टने या World Pharmacist Day 2020 च्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबूक च्या माधय्मातून मेसेजेस, विशेस, शुभेच्छापत्र देऊन त्यांचा आजचा दिवस खास बनवा.
फार्मासिस्ट देखील सध्या फ्रंटलाईन वर्कर्स प्रमाणे काम करत आहेत. त्यांच्यामुळे अनेक रूग्णांना, रूग्णांच्या कुटुंबियांना औषधं मिळणं, ती समजून घेणं सुकर होते. त्यामुळे डॉक्टर, परिचारिकांसोबतच आजारपणाला पळवून लावण्यासाठी मदत करणार्या फार्मासिस्टच्या कार्याचादेखील आज सन्मान करायला विसरू नका.
World Pharmacist Day 2020 शुभेच्छा
आजकाल व्हॉट्सॅप हे अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. या अॅपच्या माध्यामातून तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या बनवून देखील वर्ल्ड फार्मासिस्ट डे च्या शुभेच्छा शेअर करू शकता. त्यासाठी व्हॉट्सअॅप स्टिकर्स देखील प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेत.