Happy World Health Day 2020: जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देणारे Quotes, Wishes, Messages शेअर करून प्रार्थना करा प्रियजनांच्या दीर्घायुष्याची!

तुमच्यासोबत तुमच्या प्रियजनांच्या, कुटुंबीयांच्या सुदृढ आयुष्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि मेसेजच्या माध्यमातून जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे मेसेज, Wishes, HD Iamges शेअर करा.

World Health Day 2020 | File Photo

World Health Day 2020 Marathi Wishes And Messages:  आज 7 एप्रिल, जागतिक आरोग्य दिन (World Health Day) ! यंदा जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. मानव जातीचं हे War Vs Virus सुरू असताना युद्धभूमीत डॉक्टर आणि नर्स सगळ्यात आघाडीवर लढत आहेत. त्यामुळे यंदाचा आरोग्य दिन नर्स आणि इतर मेडिकल स्टार्फ यांच्या कार्याला अर्पण करण्यात आला आहे. Support nurses and midwives या थीमवर यंदा आरोग्य दिनाचं सेलिब्रेशन होणार आहे. मग आज तुम्ही देखील तुमच्या दिवसभरातील थोडा वेळ काढून त्यांचे आभार मानू शकता. सध्या कोरोना व्हायरसचं संकट पाहता जवळपास निम्मं जग लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सारीच सामान्य जनता घरामध्ये बसली आहे. मग या दिवसाचं औचित्य साधून तुमच्यासोबत तुमच्या प्रियजनांच्या, कुटुंबीयांच्या सुदृढ आयुष्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि मेसेजच्या माध्यमातून जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे मेसेज, Wishes, HD Iamges शेअर करा. World Health Day 2020: 'जागतिक आरोग्य दिन' का साजरा केला जातो? 'Support Nurses and Midwives' जाणून घ्या यंदाच्या थीमविषयी.

1950 सालापासून जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल दिवशी साजरा करण्यास सुरूवात झाली. दरवर्षी आरोग्य क्षेत्राशी निगडीत एका खास संकल्पनेवर, वैश्विक समस्या किंवा मुद्द्यावर आरोग्य दिनाची थीम असते. त्यासाठी पुढील वर्षभर काम केले जाते. यंदा रूग्णसेवेतील अविभाज्य घटक असलेल्या नर्स आणि सुईणबाई यांच्यासाठी आहे.

जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देणारे मेसेज

World Health Day 2020 | File Photo

आरोग्यम धनसंपदा

World Health Day 2020 | File Photo

जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!  

World Health Day 2020 | File Photo

जागतिक आरोग्य दिनानिमित्त तुम्हा सार्‍यांना निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य  लाभो हीच प्रार्थना!

World Health Day 2020 | File Photo

आनंदी रहा

निरोगी रहा

आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!  

World Health Day 2020 | File Photo

निरोगी आरोग्या विना वैभव असे व्यर्थ

पोषक आहार, शांत झोप अन व्यायामाने करू जीवन सार्थ 

दिवसेंदिवस धावपळीच्या आणि दगदगीच्या बनत चाललेल्या आपल्या आयुष्यात आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आज निसर्गचक्रामध्ये आपल्या अतिक्रमणामुळे मानवाने अनेक मोठी संकटं ओढावून घेतली आहेत. त्यापैकी एक कोरोना व्हायरसचा सध्या जगाच्या कानाकोपर्‍यात सारेच जण पूर्ण ताकदीनिशी सामना करत आहोत. यामुळे आपल्याला आपल्याकडून झालेल्या अनेक चूकांवर विचार करण्याची संधी मिळाली आहे. दीर्घायुषी आणि सुदृढ आरोग्यासाठी आजपासून कोणते सकारात्मक बदल करता येऊ शकतात याचा घरीच बसून विचार करा. सध्या देशात लॉकडाऊन आहे. यंदाच्या आरोग्या दिनानिमित्त आपल्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण हलका करण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळा, घरीच रहा सुरक्षित रहा!