Happy Tuesday: मंगळवारची सुरुवात करा गणपती बाप्पाच्या आशीर्वादने; प्रियजनांना हे फोटो पाठवून त्यांचीही सकाळ करा शुभ 
Photo Credit : Facebook

मंगळवार म्हणजे अर्थात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गणपती बाप्पांचा वार. या दिवशी अनेक गणेशभक्त उपवास करतात आणि मग रात्री चंद्रोदयानंतर हा उपवास सोडतात. असे म्हणतात, आपल्या आयुष्यातील विघ्न दूर व्हावी किंवा काही अनिष्ट घडू नये यासाठी श्रीगणेशामची पूजा करतात.मग आजच्या गणपती बाप्पाच्या वारच्या दिवशी आपल्या प्रियजनांचा दिवस ही शुभ जावा म्हणून त्यांना ही हे फोटो पाठवून शुभेच्छा दया. (Amla Navami 2020: 'अक्षय नवमी' कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व )

 

 

 

मंगळवारच्या दिवशी गणेशाची आरती करावी आणि गणेशासमोर नतमस्तक व्हावे. त्यानंतर चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करुन चंद्राला गंध, पाणी, अक्षता, फुले वाहावी. आणि जर तुम्ही उपवास केला असेल तर तो पूजा करुन सोडावा. गणपतीची मनोभावे पूजा केल्याने  कौटुंबिक किंवा अन्य समस्या दूर होते आणि आपल्या घरातही सुख-शांती नांदते.