Happy Teacher's Day Wishes: शिक्षक दिनानिमित्त मराठमोळे WhatsApp Status, Quotes शेअर करत व्यक्त करा गुरूंप्रति कृतज्ञता
शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मग तुमच्या शिक्षकांनाही शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रीटिंग्स नक्की शेअर करा.
Teacher's Day Quotes: भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर दिवशी भारतात शिक्षक दिन (Teacher's Day) साजरा केला जातो. विद्यार्थी आणि शिक्षकांमधील अतूट नाते साजरे करणारा हा दिवस देशभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळापासून गुरुला ईश्वरतुल्य मानले गेले आहे. "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः" या श्लोकातून गुरूंचे स्थान स्पष्ट होते. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, शिस्त आणि जीवनमूल्यांची बीजे रोवण्याचे कामही करतात. मग अशा यया महत्त्वाच्या दिनी तुमच्या आयुष्याला दिशा दाखवण्याचं काम करणार्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Greetings, HD Images शेअर करत यंदाचा शिक्षक दिन साजरा करा.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
ज्ञानाचा दिवा लावूनी, अंधःकार दूर करणारे,
आयुष्याला योग्य दिशा देणारे गुरुजन,
आज त्यांच्या ऋणाचे स्मरण करूया.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तर आयुष्य कसं जगावं हे शिकवणारे शिल्पकार असतात.
अशा सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चुका सुधारून यशाचा मार्ग दाखवणारे,
आपल्या शिक्षकांचे हे उपकार कधीच विसरता येणार नाहीत.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देतो.
अशा सर्व दीपस्तंभांना, आमच्या गुरुजनांना,
शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या प्रत्येक शिक्षकाचे योगदान आठवून त्यांचे आभार मानण्याची ही योग्य संधी असते. डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारांचा वारसा जपत, समाजात शिक्षकांना योग्य तो सन्मान आणि आदर मिळावा, हीच या दिवसामागील खरी भावना आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी वरिष्ठ विद्यार्थी त्या दिवशी शिक्षकांची भूमिका पार पाडत लहान विद्यार्थ्यांना शिकवतात, जेणेकरून त्यांना शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शुभेच्छापत्रांची देवाणघेवाण या दिवशी मोठ्या प्रमाणात होते.