Happy Republic Day HD Images 2021: प्रजासत्ताक दिन शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Message; साजरा करा लोकशाहीचा उत्सव
कारण धर्म, भाषा, जात, प्रांत, प्रदेश यांबाबत कोणताही समानता नसलेला देश म्हणजे भारत. परंतू, असे असले तरीही विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे.
Happy Republic Day 2021: भारत यंदा आपला 72 वा प्रजासत्ताक दिन (72nd Republic Day) साजरा करत आहे. प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात आली. भारत सार्वभौम झाला. तेव्हापासून भारत देश हा राज्यघटनेनुसार चालतो. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी Republic Day HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Messages इथे देत आहोत.
प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस आणि क्षणही आहे. कारण धर्म, भाषा, जात, प्रांत, प्रदेश यांबाबत कोणताही समानता नसलेला देश म्हणजे भारत. परंतू, असे असले तरीही विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. (हेही वाचा, Republic Day 2021 Rangoli Designs: प्रजासत्ताक दिनानिमित्त काढा 'या'सोप्या आकर्षक आणि Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स )
भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे स्वातंत्र्य किती काळ टीकू शकेल याबाबत जगभरातील अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती. त्यात भारतीय संविधानाने लोकशाही स्वीकारली. त्यामुळे शिक्षण, विज्ञान, आधुनिकता यांबाबत कोणतीच स्पष्टता नसलेला भारत लोकशाहीच्या मार्गाने टीकूच कसा शकेल यांवरच अनेकांना प्रश्नचिन्ह होते. असे असले तरी भारताने लोकशाही केवळ टीकवूनच नव्हे तर लोकशाही असलेला जगातील सर्वात मोठा देशही होऊन भारताने दाखवले आहे.त्यामुळे टीकाकारांचे तोंड भारताने कृतीतूनच बंदकेले आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे दोन अत्यंत महत्त्वाचे सण आहेत.