Happy Rainy Day 2019 Images: 'मान्सून 2019' चं स्वागत करणारी खास मराठमोळी ग्रिटिंग्स, HD Images,GIFs,WhatsApp Stickers

मुंबईमध्ये आज पहिल्या पावसाचं आगमन झालं आहे. मान्सून 2019 च्या शुभेच्छा डिजिटल मीडियात देण्यासाठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छा पत्र

Happy Rainy Day (Photo Credits: File Image)

Happy Rainy Day 2019 Images and Wishes In Marathi:  मागील काही दिवसापासून मुंबईकर उकाड्याने त्रस्त होते. सारा जून महिना सरला तरीही मुंबईकरांना पावसात भिजता आलं नव्हतं. मात्र आज (28 जून) महाराष्ट्रासह मुंबईमध्ये दमदार पावसाचं (Mumbai Monsoon) आगमन झालं आहे. आज शुक्रवार असल्याने पुढे जोडून आलेला विकेंड यामुळे अनेकांनी आज बाहेर पडून पहिल्या पावसाचा आनंद घेण्याचा प्लॅनही बनवला असेल. तर तुंबई झालेल्या मुंबईमध्ये ट्राफिक जॅम मध्ये न अडकता अनेकजण घरीच बसून चहा-भजीचा आनंद लूटण्याचे प्लॅन बनवत आहे. प्रत्येकाची पहिल्या पावसाची अनंद लूटण्याची पद्धत वेगवेगळी असेल पण हा निसर्गातील बदल मनाला आनंदून टाकणारा आहे. या नव्या ऋतूचा आनंद आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना फेसबूक (Facebook), व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp Status) च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

पहिल्या पावसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रिटिंग्स

हळूवार दाटती मेघ नभी

हळूवार पसरतो गारवा..

सर्वांग फुलते आगमनाने

स्मरून वाहतो मनी

स्पर्श नवा हर्ष नवा...

Happy Rainy Day!

Happy Rainy Day (Photo Credits: File Image)
Happy Rainy Day (Photo Credits: File Image)

पहिला पाऊस नेहमीच एक आठवण देऊन जातो

कोणाला तरी भिजताना पाहून न भिजताच कुणीतरी चिंब भिजून जातो

Happy Rainy Day!

Happy Rainy Day (Photo Credits: File Image)
Happy Rainy Day (Photo Credits: File Image)

आज पावसाला देखील मस्त रंग चढलाय

जणू तोही कुणाच्या प्रेमात पडलाय

Happy Rainy Day!

Happy Rainy Day (Photo Credits: File Image)

Monsoon GIFs

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

Monsoon WhatsApp Stickers 

व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही तुम्ही मान्सून 2019 चं स्वागत करून शुभेच्छा पाठवू शकता. याकरिता गूगल प्ले स्टोअरवरून तुम्ही खास व्हॉट्स स्टेट्सचं पॅकेज डाऊनलोड करू शकता.

मुंबईमध्ये आज सकाळापासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. पुढील काही तास असाच मुसळधार पाऊस पडेल हा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा आनंद लूटताना स्वतःची आणि आरोग्यची काळजी घ्या नक्की!