Happy Parsi New Year Wishes: पारशी नववर्षाच्या शुभेच्छा Messages,HD Images Greetings च्या माध्यमातून शेअर करून द्बिगुणित करा 'नौरोज़'चा आनंद
Navroz Mubarak 2020 Greetings : भारतामध्ये आज पारशी समाजासाठी मोठा उत्साहाचा दिवस आहे. आज (16 ऑगस्ट) दिवशी देशात पारशी समाजाचे नववर्ष (Parsi New Year) सुरू झाले आहे. फरवर्दीन महिन्याचा पहिला दिवस हा पारशी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दरम्यान हा सण नवरोझ / नौरोज म्हणून साजरा केला जातो. मग तुमच्या पारशी मित्र-मैत्रिणींना यंदा नवरोझ मुबारक (Navroz Mubarak) अशा शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images,मेसेजच्या माधयामातून व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम वर शेअर करू शकता. Parsi New Year 2020: पतेती आणि नवरोझ मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या पारशी नववर्षाचा पहिला आणि त्याच्या शुभेच्छा कशा दिल्या जातात?
भारतामध्ये पारशी समाज शहेनशाही कॅलेंडर नुसार नववर्ष साजरं करते. त्यामध्ये लीप इयर मोजले जात नाही. त्यामुळे भारतात आणि ईराण मध्ये दोन वेगवेगळ्या दिवशी नवरोझ साजरा केला जातो. भारतात पारशी नववर्ष हे ऑगस्ट महिन्यात साजरे केले जाते. मग त्यानुसार आज असलेल्या या पारशी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
नवरोझ मुबारक!
पारशी समाजाचं नवं वर्ष ही नव्या पारशी वर्षाची/ कॅलेंडरची सुरूवात असते. अग्यारी या त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन ते प्रार्थना करतात. एकमेकांना गळाभेट देत, नववर्षाच्या शुभेच्छा देतात. यादिवशी दानधर्माची देखील प्रथा आहे. भारतात सुमारे साठ हजार पारशी धर्मीय राहतात.