Happy New Year 2021 Quotes: नववर्ष दिन सकारात्मकतेने सुरू करण्यासाठी मराठमोळे संदेश,WhstaApp Status आणि मेसेजेस!
New Year 2021 Quotes in Marathi: यंदा कोविड 19 मुळे 2020 बद्दल चांगल्या आठवणी फारच कमी लोकांकडे असतील पण त्या वर्षातलं काय गमावलं पेक्षा नवं काय कमवण्याची संधी देऊन गेलं याचा विचार करून आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिनी सकारात्मक सुरूवात करून पहा.
New Year 2021 Quotes in Marathi: हॅप्पी न्यू ईयर फ्रेंड्स! वाईट बातम्यांच्या भडीमाराने, कोरोना वायरसच्या हल्ल्याने ग्रासलेल्या जगाने काही तासांपूर्वी 2020 ला निरोप दिला आहे आणि नव्या वर्षाचं म्हणजेच 2021 चं स्वागत करत नववर्ष दिन सुरू झाला आहे. आज नव्या वर्षाचा पहिला दिवस, पहिली पहाट आहे. सरत्या वर्षासोबत सारी संकट दूर सारून नव्या उमेदीने पुन्हा उभं राहण्याचा आज अनेकजण प्रयत्न करत आहे. तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, प्रियजनांमध्ये असेच काही निराशाच्या सावटाखाली असलेली मंडळी असतील तर त्यांना आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी काही सकारात्मक विचार, नववर्षाच्या शुभेच्छा आणि गुड मॉर्निंग मेसेज सोबत New Year Quotes मराठी संदेश, शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स यांच्यामाध्यमातून WhatsApp Status, Facebook Messages, WhatsApp Stickers द्वारा शेअर करून स्पेशल करायला मूळीच विसरू नका. New Year 2021 Images: नवीन वर्षाच्या निमित्ताने मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!
नवं वर्ष ही नवी सुरूवात असते. अनेकांसाठी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी हे दिवस म्हणजे इतर दिवसांप्रमाणेच कॅलेंडरचं पान पलटून अजून एक दिवस इतकं सामान्य असतं. तर काही जणं ही नव्या वर्षाची सुरूवात पुन्हा सारं नव्याने सुरू करण्याची आकांक्षा घेऊन नव्या उर्मीने सुरू करतात. यंदा कोविड 19 मुळे 2020 बद्दल चांगल्या आठवणी फारच कमी लोकांकडे असतील पण त्या वर्षातलं काय गमावलं पेक्षा नवं काय कमवण्याची संधी देऊन गेलं याचा विचार करून आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिनी सकारात्मक सुरूवात करून पहा. नववर्ष दिन Google Doodle: गूगल ने दिल्या 2021 नववर्षाच्या पहिल्या दिवशी खास अॅनिमेटेड डूडल द्वारा शुभेच्छा!
हॅप्पी न्यू ईयर 2021 कोट्स
प्रत्येक नवा दिवस येण्याआधी संपलेली एक काळरात्र असते,
नवा दिवस म्हणजे पुन्हा एक नवी सुरूवात असते!
नव्या स्वप्नांची नवी लाट
नवा आरंभ नवा थाट
आत्मविश्वासाने पुन्हा करा
नव्या वर्षाची नवी सुरूवात
भूतकाळात जाऊन चूका सुधारण्याची संधी आपल्याला नाही
पण एक नवीन सुरूवात करून यशस्वी शेवट करण्याची संधी मात्र नक्की आहे!
प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा
प्रत्येक दिवशी जीवनाशी नवी सुरूवात करा
विसरून निराशा, स्वप्न पाहू नव्याने
करूया नववर्षाची सुरूवात पुन्हा नव्या दमाने
नवं वर्ष ही नवी सुरूवात या नियमाने त्याच्याकडे बघणार असाल तर आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनेक जण त्याची सुरूवात करण्यासाठी अनेक संकल्प करतात. यामध्ये फीटनेस पासून आर्थिक स्तरावर अनेक संकल्प असतात. लहान लहान गोल ठरवण्या पासून सुरूवात करा.