Happy Navratri 2024 Messages In Marathi: शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत खास करा घटस्थापनेचा दिवस
महाराष्ट्रामध्ये नवरात्रीच्या दिवसामध्ये भोंडला खेळला जातो.
Navratri 2024 Marathi Messages & Wishes: नवरात्रीची (Navratri) धामधूम यंदा भारतामध्ये 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. भारतात विविध भागात थोड्या फार फरकाने सारख्याच स्वरूपात नवरात्र साजरी केली जाते. शारदीय नवरात्र यंदा 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर असे दहा दिवस साजरी केली जाणार आहे. या नवरात्री मध्ये स्त्री शक्तीचा जागर करण्याची पद्धत आहे. मग अशा या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Facebook Messages, Greetings, Quotes द्वारा नवरात्रीच्या शुभेच्छा देत या दहा दिवसांच्या सणासुदीच्या पर्वाला साजरं करण्यासाठी सज्ज व्हा.
नवरात्रीमध्ये घटस्थापना करून देवीच्या नऊ विविध रूपांचे पूजन केले जाते. नवरात्रीची सांगता दसरा म्हणजेच विजया दशमी साजरी करून केली जाते. या दिवशी घटाची किंवा देवीच्या मूर्तीचं विसर्जन केले जाते. आजकाल नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग परिधान करून महिला त्यांच्यामधील एकजुटीचं प्रतिक दाखवतात. नक्की वाचा: Shardiya Navratri 2024 Colours With Days: 3 ऑक्टोबर पासून सुरू होत शारदीय नवरात्री मध्ये यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पहा 10 दिवसांचे रंग.
शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा
नवरात्री मध्ये दिवसा देवीचा जागर करून रात्री तिच्यासमोर गरबा, दांडिया खेळण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये नवरात्रीच्या दिवसामध्ये भोंडला खेळला जातो. तर पश्चिम बंगाल मध्ये नवरात्री मध्ये षष्ठी पासून दशमी पर्यंत दुर्गापूजा साजरी केली जाते.