Happy Independence Day 2019: खास HD Images, Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा भारतीय स्वातंत्र्य दिन

देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तर असा हा खास स्वातंत्र्य दिन व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही HD Images, Wallpapers शेअर करून साजरा करा.

Happy Independence Day 2019 (File Image)

Happy Independence Day 2019: हाच तो दिवस जेव्हा भारत 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगीरीतून मुक्त झाला होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयांनी स्वतंत्र देशाची नवी पहाट पहिली होती. हा दिवस इतका सोप्या रीतीने अनुभवायला मिळाला नव्हता. यासाठी  असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा कुठे  भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. म्हणूनच आज आपण 73 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करू शकत आहोत. महात्मा गांधी यांचे 'भारत छोडो' आंदोलन, गांधी आणि जिना यांच्यातील वाद यामुळेच माऊंटबॅटन यांनी अखेर 1947 साली भारताला स्वातंत्र्य बहाल केले.

आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी सर्वात मोठा सण आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तर असा हा खास स्वातंत्र्य दिन व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही HD Images, Wallpapers शेअर करून साजरा करा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(हेही वाचा: Independence Day Quotes: स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणारे महत्त्वपूर्ण कोट्स)

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. मात्र संपूर्ण जगाच्या नाकावर टिच्चून आजही भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश ओळखला जातो.