Happy Holi 2020 Images: 'होळी' सणाच्या निमित्ताने 'या' खास HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या शुभेच्छा!
हा सण हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा 9 मार्चला हा सण साजरा केला जाणार आहे. हा सण भारतात दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते यालाचं 'धूलिवंदन' किंवा 'रंगपंचमी' असे म्हटले जाते.
Happy Holi 2020 Images: होळी हा वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा 9 मार्चला हा सण साजरा केला जाणार आहे. हा सण भारतात दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते यालाचं 'धूलिवंदन' किंवा 'रंगपंचमी' असे म्हटले जाते.
या दिवशी सर्व लोक आपले जुने राग विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उस्तुकता असते. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत असतात. तुम्हाही तुमच्या मित्र-मैत्रिणींना HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Holi 2020 Date: होळी कधी आहे? जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त ते रंगपंचमी सेलिब्रेशनच्या तारखा)
होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते या मागे एक आख्यायिका आहे. राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत होता. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हाद ला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहीण होळीकाची मदत घेतली. होळीकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून होळीकाने प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला. परंतु, विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळीका भस्म झाली. या कथेचा हेतू म्हणजे कधीही चांगल्याचा विजय होतो. त्यामुळे नेहमी कोणाविषयी द्वेष न बाळगता वागा.