Happy Holi 2019: होळीच्या निमित्त खास बॉलिवूडमधील गाजलेली गाणी (Video)

हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.

Happy Holi 2019 (Photo Credits- Twitter)

Happy Holi 2019: वसंत ऋतुमध्ये अगदी आनंदात-उत्साहासात साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. तसेच परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथेनुसार दोन दिवस हा सण साजरा केला जातो. तर पहिल्या दिवशी होळी दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंगाची उधळण करुन त्याचा आनंद व्यक्त केला जातो त्याला धुलिवंदन असे म्हटले जाते.

होळीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. परंतु उत्तर भारतामधील होळीला विशेष महत्व असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे होळी पाहण्यासाठी लोक खास वज्र, वृंदावन, गोकूळ या ठिकाणी आवश्यक भेट देतात. मात्र वज्र येथे साजरी करण्यात येणाऱ्या होळीच्या सणात पुरुष मंडळी महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारण्याची प्रथा फार प्रचलित आहे. त्यामुळे लोक खासकरुन वज्र येथे होळीच्या निमित्ताने परंपरेने चालत आलेली प्रथा पाहण्यासाठी खास उपस्थिती लावतात. तर बॉलिवूड कलाकारांमध्ये ही होळीचा सण खुप उत्साहास साजरा केला जातो. तर 90's मधील ही गाणी तुम्हाला यंदाचा होळीचा आनंद द्विगुणीत करण्यास मदत करतील.(हेही वाचा-Happy Holi 2019: होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!)

Bollywood Famous Holi Songs:

आज ना छोडेंगे...

होली आई रे...

रंग बरसे...

बलम पिचकारी...

लेट्स प्ले होली...

होळीच्या निमित्त विविध प्रकारचे खाद्यपदार्थ घरी बनवले जातात. मात्र खासकरुन प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा बेत जरुर केला जातो. त्याचसोबत काही ठिकाणी भांग पिणे ही देखील होळीच एकप्रकारे प्रथा असल्याचे मानले जाते. मात्र होळीच्या निमित्ताने सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून ही देण्यात येतो. त्यामुळे यंदाची होळी जल्लोषात आणि आनंदात साजरा करुयात.