Happy Gurpurab 2018: जीवनातील साऱ्या दुःखांवर उपाय आहेत गुरुनानकांचे हे '९' बहुमूल्य उपदेश !
शीख धर्मीय उत्साहाने साऱ्या गुरूंचा जन्मदिन साजरा करतात. या उत्सवाला' गुरुपर्व' (GuruParv) असेही म्हटले जाते. गुरुनानकांची जयंती 'गुरुपूरब'(Gurpurab)म्हणून देखील ओळखली जाते.
Guru Nanak Jayanti 2018 : शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गुरुनानक (Guru Nanak ) हे पहिले पहिले शीख गुरु आहेत. त्यांच्या जन्मदिवसाचा सोहळा 'प्रकाश उत्सव' म्हणून साजरा केला जातो. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये आणि जगभरात वसलेले शीख बांधव कार्तिक पौर्णिमेच्या ( Kartik purnima) दिवशी गुरुनानक जयंती साजरी करतात. तीन दिवस चालणाऱ्या यासोहळ्यामध्ये गुरुद्वारा आणि घरांमध्ये चैतन्याचं वातावरण असतं. गुरुद्वारांवर फुलांची रोषणाई केली जाते.
गुरुनानक यांचा जन्म 15 एप्रिल 1469 साली झाला. मात्र हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक पौर्णिमेला गुरुनानक जयंती (Guru Nanak Jayanti ) साजरी केली जाते. यंदा गुरुनानाकांची 549 वी जयंती 23 नोव्हेंबरलासाजरी केली जात आहे. पण आजही त्यांनी दिलेली शिकवण आपल्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन उत्तर मिळवून देतं. Guru Nanak Jayanti 2018 : भारतासह जगभरात 3 दिवस साजरा केला जातो खास गुरुपर्व उत्सव !
गुरुनानकांचे नऊ बहुमूल्य उपदेश !
१. ईश्वर एक आहे -
गुरुनानकांनी ' इक ओंकार .. 'हा मंत्र दिला आहे. अनेकदा गुरुद्वाराच्या परिसरात सकाळी तुम्ही ऐकला असेल. मन शांत करणारा हा मंत्र धर्म वेगळा असला तरीही ईश्वर एकाच आहे. देव चराचरात वसला आहे त्यामुळे पित्याप्रमाणे आपल्यावर लक्ष ठेवून रक्षण करणाऱ्या देवाच्या आपण लेकरांनी लेकरांनी एकत्र गुण्यागोविंदाने राहायला हवे.
२. पैशाचा लोभ नको
प्रत्येक काम कष्टाच असतं त्यासाठी मेहनत करूनच पैसे कमवायला हवेत.
३. हक्क हिसकावून घेऊ नका -
कधीच कोणाचाच हक्क हिसकावून घेऊ नका. अपार कष्ट आणि मेहनतीने जे मिळेल जितकं मिळेल त्यामध्ये खुश रहा. गरजवंताला मदत करा.
४. पैशांना योग्य ठिकाणी ठेवा -
पैशाच्या हव्यासापायी आपण अनेक गोष्टींचा आनंद गमावून बसतो. त्यामुळे खिशात पुरतील आणि गरज असेल तितक्याच पैशाच्या मागे धावा.
५. स्त्रियांचा आदर करा -
स्त्रियांचा आदर करणं आवश्यक आहे. सामजात स्त्री -पुरुष दोन्ही समान आहेत.
६. कामाचा ताण टाळा -
कामाचा ताण टाळणं आवश्यक आहे. ज्या गोष्टीतुन तुम्हांला आनंद मिळतो तीच गोष्ट करा. यामुळेच तुम्ही तणावमुक्त आणि प्रसन्न राहू शकता.
७. जगावर विजय मिळवण्याचा मंत्र
जगावर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील दोष नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या दोषांवर मात करू शकलात तरच जग प्रेमाने जिंकू शकता.
८. विनम्रता -
जगाशी विनम्रतेने वागा. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे त्यामुळे शत्रूला जिंकायचं असेल तर विनम्रतेने वागा.
९. जातीवाद टाळा -
गुरु नानकांनी कायम जातीवाद टाळण्याची शिकावन त्यांच्या प्रवचनांमधून दिली. सोबतच कायम सत्याचा मार्ग निवडा हा संदेश त्यांनी दिला आहे.
शीख धर्मीय उत्साहाने साऱ्या गुरूंचा जन्मदिन साजरा करतात. या उत्सवाला' गुरुपर्व' (GuruParv) असेही म्हटले जाते. गुरुनानकांची जयंती 'गुरुपूरब'(Gurpurab)म्हणून देखील ओळखली जाते. हा दिवस गुरु नानक प्रकाश उत्सव म्हणून साजरा केला जातो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)