Happy Gatari Messages For Wife: बायकोला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Greetings, Quotes!

तुमची गटारी स्पेशल करण्यासाठी तुमच्यासाठी चमचमीत मांसाहार बनवणार्‍या तुमच्या बायकोला गटारीच्या शुभेच्छा देत हा दिवस थोडा अजून स्पेशल करू शकता.

गटारी अमावस्या (Gatari Amavasya) हा श्रावणापूर्वी मांसाहाराचा मनसोक्त आनंद घेण्याचा दिवस असतो. गटारी या नावाशी अनेक समज-गैरसमज जोडलेले आहेत पण गटारी हा मूळ शब्द नसून गतहारी असा हा शब्द होता आणि अपभ्रंश होत त्याचा गटारी झाला आहे. त्यामुळे गटारी म्हणजे मद्यपान, गटारात लोळण्याचा दिवस नसून जवळच्या लोकांसोबत एकत्र मांसाहारी पदार्थांवर ताव मारण्याचा दिवस असतो. मग यंदा तुमच्या पत्नीसोबत ही गटारी साजरी करणार असाल तर तिला मराठ्मोळ्या मेसेजेस (Messages ), संदेश, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp Status), इंस्टाग्राम स्टेटस (Instagram Status), शुभेच्छापत्र शेअर करत या गटारीच्या मजेशीर शुभेच्छा देऊ शकता.

गटारीच्या निमित्ताने खास गटारी पार्टी किंवा आखाड पार्टीचं आयोजन केले जाते. श्रावण महिना हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असल्याने आणि अनेक सण- व्रत वैकल्याची रेलचेल असल्याने मांसाहार, मद्यपानापासून दूर राहण्याचा महिना असतो. मग तुमची गटारी स्पेशल करण्यासाठी तुमच्यासाठी चमचमीत मांसाहार बनवणार्‍या तुमच्या बायकोला गटारीच्या शुभेच्छा देत हा दिवस थोडा अजून स्पेशल करू शकता. नक्की वाचा: Gatari 2026: गटारी किंवा आखाड पार्टी यंदा तुमच्या पत्नी सोबत कशी कराल साजरी? 

बायकोला गटारीच्या शुभेच्छा

 

Happy Gatari Wishes For Wife
Happy Gatari Wishes For Wife
Happy Gatari Wishes For Wife
Happy Gatari Wishes For Wife
Happy Gatari Wishes For Wife

'गत' म्हणजे गेलेला किंवा सोडलेला आणि 'आहार' म्हणजे भोजन. श्रावण महिन्यात हिंदू परंपरेनुसार महिनाभर सात्विक आहार घेण्याचा नियम पाळला जातो. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी मांसाहारी किंवा जड आहाराचा त्याग करण्यापूर्वीचा शेवटचा दिवस म्हणून याला 'गतहारी' (म्हणजेच ज्या आहाराचा त्याग करायचा आहे असा दिवस) म्हटले गेले. कालांतराने बोलीभाषेत 'गतहारी' या शब्दाचा अपभ्रंश होऊन 'गटारी' हा शब्द रूढ झाला.

काही जण घरातच गटारीचं सेलिब्रेशन करतात पण अनेक हॉटेल्स देखील आता ग्राहकांचे गटारी सेलिब्रेशन त्यांच्या हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये करतात. या निमित्ताने खास गटारी स्पेशल मेंन्यू, थाळीचं आयोजन करून त्यांना आकर्षित करतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement