Happy Ganesh Chaturthi 2026 Images: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा Photos, Images, Quotes च्या माध्यमातून शेअर करत साजरे करा गणपतीचे आगमन
महाराष्ट्रात हा सण विशेष भव्य स्वरूपात साजरा होतो. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले, त्या परंपरेचा वारसा आजही कायम आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होणारा गणेश चतुर्थीचा सण यंदा सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी येत आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला साजऱ्या होणाऱ्या या सणापासूनच दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होते. यंदा बापा 12 दिवस भाविकांच्या सेवेत दाखल असणार आहे. मग आजच्या या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा WhatsApp status, Messages, Quotes, Images, Wishes शेअर करून बापाच्या आगमनाचा हा सोहळा अजूनच खास बनवा. नक्की वाचा: Ganpati Invitation Card Template Marathi: गणपती दर्शनासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रण पाठवण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस.
बुद्धी, समृद्धी आणि विघ्न दूर करणारी देवता म्हणून गणपतीची पूजा केली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने केली जाते, अशी परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.महाराष्ट्रात हा सण विशेष भव्य स्वरूपात साजरा होतो. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले, त्या परंपरेचा वारसा आजही कायम आहे. नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2026: हरतालिका, गणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी मग बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी? जाणून घ्या मुहूर्ताची वेळ .
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच 12 दिवस चालणार आहे. या कालावधीत घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण चैतन्यमय होऊन जाते.
मोदक हा बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य मानला जातो. या काळात दुर्वा, जास्वंदाची फुले आणि पारंपरिक नैवेद्यांनी बाप्पाची पूजा केली जाते. अनेक कुटुंबांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवसांचा गणपती बसवण्याची परंपरा आहे.