Happy Friendship Day 2024 Wishes In Marathi: फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा देत मित्रांचा खास करा दिवस!

UN ने अधिकृतपणे 30 जुलै ही मैत्री दिनाची तारीख जाहीर केली आहे, परंतु भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो.

Happy Friendship Day 2024 Wishes In Marathi: फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा देत मित्रांचा खास करा दिवस!
फ्रेंडशीप डे । File Image

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे (Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा फ्रेंडशीप डे 4 ऑगस्ट दिवशी आहे. मित्र परिवार हा आपल्या आयुष्यातील असं एक नातं आहे जे आपल्या फार जवळ असतं आणि ते आपण निवडलेलं असतं. त्यामुळे या मैत्रीदिनाचं औचित्य साधून तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना फ्रेंडशीप डे (Happy Friendship Day 2024 Wishes) च्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes, Greetings, Facebook Messages, Quotes द्वारा देत आजचा हा दिवस थोडा खास करा.

आयुष्यातील चढ-उतारामध्ये आपल्याला जमिनीवर ठेवणारं कुणी असेल तर ते आपले मित्र असतात. म्हणून तुमच्या त्यांचं असणं खास आहे याची त्यांच्यापाशी कबुली देत त्यांना तुमच्यासोबत जोडून ठेवा. फ्रेंडशीप डे हा पूर्वी हातात खास फ्रेंडशीप बॅन्ड बांधून, एकमेकांना ग्रीटिंग्स देऊन, एकमेकांसोबत मज्जामस्ती करत साजरा केला जात आहे. कॉलेजच्या कट्ट्यांवर या दिवशी विशेष सेलिब्रेशन पहायला मिळतं. International Friendship Day 2024: जाणून घ्या आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त ग्रीटिंग कार्ड देण्याची प्रथा कशी सुरू झाली .

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चांगल्या काळात हात धरणं
म्हणजे मैत्री नव्हे
वाईट काळात हात न सोडणं म्हणजे मैत्री
हॅप्पी फ्रेंडशीप डे!
फ्रेंडशीप डे । File Image
आठवणींच्या भोवऱ्यात एक क्षण आमचा असो,
बहरलेल्या फुलांमध्ये एक फुल आमचे असो,
जेव्हा तुम्ही मित्रांची आठवण काढाल,
तेव्हा त्या नावांच्या यादीत एक नाव आमचंही असो
हॅपी फ्रेंडशिप डे!
फ्रेंडशीप डे । File Image
प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा
मित्रांच्या कट्ट्यांवर येणारी मजा
काही औरच असते...
हॅपी फ्रेंडशिप डे!
फ्रेंडशीप डे । File Image
गुण जुळले की लग्न होतात
आणि दोष जुळले की मैत्री
फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा
फ्रेंडशीप डे । File Image
मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाणं
हॅप्पी फ्रेंडशिप डे!
फ्रेंडशीप डे । File Image

UN ने अधिकृतपणे 30 जुलै ही मैत्री दिनाची तारीख जाहीर केली आहे, परंतु भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डे कसा सुरू झाला याचा अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एका कथेनुसार, 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकेत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी त्याच्या जवळच्या मित्राला कळली तेव्हा तो सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. मैत्रीत एकत्र जगणे आणि मरणे हे उदाहरण समोर आल्यानंतर अमेरिकेने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला.

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2024 11:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).