Happy Friendship Day 2024 Images: मैत्री दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes, Quotes देत साजरा करा फ्रेंडशीप डे!
हे नाते असे आहे जे फक्त भावनेवर पुढे जाते. मैत्री कुणाचीही कोणाशीही असू शकते. मैत्रीला कोणतीही बंधने नसतात. वयाची मर्यादा नसते. त्यामुळे प्रत्येकाला एकतरी जवळचा, खास मित्र नक्की असावा.
आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार (4 ऑगस्ट) फ्रेंडशीप डे (Friendship Day) म्हणून साजरा केला जात आहे. मग आजच्या या खास दिवसाची सुरूवात तुमच्या मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देत आणि मैत्री दिनाचा आनंद द्विगुणित करून देताना खास लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली Greetings, Wishes, Facebook Messages, Photos, Images शेअर करून देऊ शकता. अमेरिकेमध्ये या मैत्रीदिनाची सुरूवात झाली, हळूहळू हे सेलिब्रेशन साजरं करण्याची पद्धत जगभर पोहचली. आता तरूणाई कॉलेज, शाळांमध्येही मोठ्या उत्साहाने फ्रेंडशिप डे साजरा करतात.
फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने मित्र मंडळी एकत्र येऊन हा दिवस आनंदामध्ये साजरा करतात. या दिवसाच्या निमित्ताने एकत्र मजामस्ती करतात. एकमेकांना चॉकलेट्स, ग्रिटिंग्स दिली जातात. मग असा हा आनंदाचा दिवस तुम्ही एकमेकांना किमान शुभेच्छा देऊन साजरा करायला विसरू नका. मैत्री या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. हे नाते असे आहे जे फक्त भावनेवर पुढे जाते. मैत्री कुणाचीही कोणाशीही असू शकते. मैत्रीला कोणतीही बंधने नसतात. वयाची मर्यादा नसते. त्यामुळे प्रत्येकाला एकतरी जवळचा, खास मित्र नक्की असावा. Happy Friendship Day 2024 Wishes In Marathi: फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा देत मित्रांचा खास करा दिवस!
फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा
, 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकेत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी त्याच्या जवळच्या मित्राला कळली तेव्हा तो सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. मैत्रीत एकत्र जगणे आणि मरणे हे उदाहरण समोर आल्यानंतर अमेरिकेने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. UN ने अधिकृतपणे 30 जुलै ही मैत्री दिनाची तारीख जाहीर केली आहे, परंतु भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो.