Merry Christmas 2021 Messages: ख्रिसमसनिमित्त खास Wishes, HD Images, Wallpapers पाठवून द्या नाताळ सणाच्या शुभेच्छा

ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. अकराव्या व बाराव्या शतकात ख्रिसमस कॅराॅल किवा नाताळ गीतांची प्रथा जर्मनीत सुरू झाली

Merry Christmas (File Image)

डिसेंबर महिना सुरु झाला की वेध लागतात ते ख्रिसमसचे. दरवर्षी 25 डिसेंबरला जगभरात येशू ख्रिस्ताचा जन्मदिन ‘ख्रिसमस’ म्हणून साजरा केला जातो. मराठीमध्ये या सणाला नाताळ असे म्हणतात. निष्कलंक कुमारिका मारियाच्या पोटी येशून जन्म घेतला म्हणून ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हटले जाते. ख्रिसमसचे नाव देखील ख्रिस्तावरूनच पडले. बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही, परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. या तारखेबाबत अनेक वाद झाले. पण इ.स. 345 वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘25 डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस 25 डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला.

ख्रिसमसचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी 25 डिसेंबरच्या बरेच दिवस अगोदर घरे सजवली जातात, रोषणाई केली जाते, पार्टीची तयारी होते. या सणात सांताक्लॉज (Santa Claus) तसेच 'क्रिसमस ट्री' (Christmas Tree) यांना विशेष महत्व असते. ख्रिसमस सणाचे सेलिब्रेशन 24 डिसेंबर संध्याकाळपासून सुरु होते. त्याच रात्री चर्चमध्ये ‘मास’ म्हणजेच सामुहिक प्रार्थनेचे आयोजन केले जाते. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी किंवा मित्रांच्या घरी भेट देऊन ख्रिसमस साजरा करतात.

या सणाचे औचित्य साधून तुम्ही खास Messages, Images, WhatsApp Status, SMS, च्या माध्यमातून शेजारी, मित्र परिवार, नातेवाईक, ख्रिस्ती बांधव यांना शुभेच्छा देऊ शकता.

Happy Christmas 2021 Messages
Happy Christmas 2021 Messages
Happy Christmas 2021 Messages
Happy Christmas 2021 Messages
Happy Christmas 2021 Messages

दरम्यान, दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. अकराव्या व बाराव्या शतकात ख्रिसमस कॅराॅल किवा नाताळ गीतांची प्रथा जर्मनीत सुरू झाली. केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, अंड्याचे प्रकार अशा अनेक खाद्यपदार्थांनी ख्रिसमसची सकाळ व दुपास सजलेली असते. (हेही वाचा: नाताळ सणासाठी 'क्रिसमस ट्री' ला का आहे विशेष महत्व; जाणून घ्या यामागचे मूळ कारण)

दरम्यान, नाताळनंतरच्या पहिल्या आठवाड्यातील पहिला दिवस ‘बॉक्सिंग डे’ म्हणून पाळण्याची प्रथा अजूनही काही देशांत आहे. जे लोक वर्षभर आपल्या उपयोगी पडले, त्यांना या दिवशी काही भेटवस्तू ‘बॉक्स’ मध्ये घालून देतात. तर अशाप्रकारे ख्रिस्ती बांधवांसाठी हे ख्रिसमसचे पर्व सर्वात मोठे आणि महत्वाचे असल्याने ते धुमधडाक्यात साजरे होते.

Tags

Advance Christmas Greetings Advance Christmas Wishes Advance Merry Christmas Greetings Advance Merry Christmas Wishes Christmas Christmas 2021 Christmas 2021 Date Christmas 2021 Wishes in Marathi Christmas Facebook Post Christmas Greetings Christmas Greetings 2021 Christmas HD Images Christmas HD Images 2021 Christmas images Christmas Messages Christmas Messages 2021 Christmas WhatsApp Status Christmas Wishes Christmas Wishes 2021 Christmas Wishes In Advance Happy Christmas 2019 Messages Happy Christmas Wishes Merry Christmas 2021 Merry Christmas 2021 Wishes in Marathi Merry Christmas Greetings Merry Christmas Images Merry Christmas Wishes Merry or Happy Christmas Wishes Natal 2021 क्रिसमस 2021 क्रिसमसच्या शुभेच्छा ख्रिसमस ख्रिसमस 2021 ख्रिसमस 2021 एचडी इमेज ख्रिसमस ग्रीटींग्स ख्रिसमस मराठी शुभेच्छा ख्रिसमस मराठी शुभेच्छा संदेश ख्रिसमस मेसेज ख्रिसमस शुभेच्छा ख्रिसमसच्या शुभेच्छा नाताळ नाताळ 2021 नाताळ फेसबुक पोस्ट नाताळ मराठी शुभेच्छा संदेश नाताळ मराठी शुभेच्छापत्रं नाताळ मेसेज नाताळ शुभेच्छा नाताळच्या शुभेच्छा मेरी ख्रिसमस